घरमहाराष्ट्रनक्की करतोय काय, हे केंद्रालाही कळत नाहीये - उद्धव ठाकरे

नक्की करतोय काय, हे केंद्रालाही कळत नाहीये – उद्धव ठाकरे

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग समोर आला असून त्यामध्ये त्यांनी बुलेट ट्रेनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये राज्याशी, राजकारणाशी आणि महाविकासआघाडीच्या सरकारच्या ध्येयधोरणांशी संबंधित अनेकविध मुद्द्यांना उत्तरे दिली, तर काही मुद्द्यांवरून विरोधकांवर आणि भाजपवर निशाणा देखील साधला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी केंद्र सरकारकडून राज्याची आर्थिक कोंडी केली जात आहे का? या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी भाजपशासित केंद्र सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली बुलेट ट्रेन हे काही आमचं स्वप्न नाही, असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी लगावला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

‘मला असं वाटतंय, की केंद्र सरकार नेमक्या कोणत्या दिशेने जाऊ इच्छिते आणि सध्या कोणत्या दिशेने जात आहे, हे मलाच काय, खुद्द केंद्राला देखील कळतं की नाही हाच मोठा प्रश्न आहे. सध्या सगळा गोंधळच सुरू आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘केंद्राकडून येणारी मदत मिळायला हवी तशी येत नाही हे वास्तव आहे. जीएसटी वगैरेसारखी जी खुळं आहेत, त्यातूनही. राज्याला मिळणाऱ्या आर्थिक निधीमध्ये दिरंगाई होतेय आणि त्यामुळे राज्यातल्या योजना लांबणीवर पडत आहेत. पण ते जाणूनबुजून करत आहेत, असं काही मी म्हणत नाही’, असं यावेळी उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

- Advertisement -

‘बुलेट ट्रेन आमचं स्वप्न नाही’

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका केली. ‘बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावर सगळ्यांना सोबत घेऊन बसून नीट विचार व्हायला पाहिजे. नक्की बुलेट ट्रेनचा उपयोग कुणाला होणार आहे, त्यामुळे राज्यात किती उद्योगधंदे येणार आहेत, हे सगळं पटवून द्या. ते जनतेसमोर मांडल्यानंतर त्याचं काय करायचं ते पाहू’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, ‘बुलेट ट्रेन हे पंतप्रधानांचं ड्रीम प्रोजेक्ट असलं, तरी जेव्हा डोळे उघडतात तेव्हा समोर स्वप्न नसतं, तर सत्य परिस्थिती असते’, असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी लगावला.


हेही वाचा – महाराष्ट्रात NRC लागू होऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -