Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी आंदोलन कोरोनाच्या विरोधात करा, मुख्यमंत्र्यांची राजकारण्यांना विनंती

आंदोलन कोरोनाच्या विरोधात करा, मुख्यमंत्र्यांची राजकारण्यांना विनंती

कोरोनामध्ये राजकारण आणू नका, राजकारण आपलं होत जीव मात्र जनतेचा जातो. त्या जनतेच्या जिवाचा खेळ होऊ देऊ नका

Related Story

- Advertisement -

राज्याच्या कोविड टास्क फोर्सच्या टीमने आज माझा डॉक्टर ही ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत टास्क फोर्सचे सर्व डॉक्टर्स आणि त्यांची टीम उपस्थित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घ्यायला हवी, टास्कफोर्सकडून जे निर्बंध शिथिल करण्यात आलेत त्याचे पालन करावे लागले,अशा सूचना देण्यात आल्या. वैद्यकीय परिषदेच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी ( CM Uddhav Thackeray)  जनतेला संबोधित केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला नियम पाळण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या नियमांना विरोध करणाऱ्या राजकारण्यांना त्यांना खडे बोल सुनावत विनंती देखील केली.  ‘काही जणांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई लागली आहे. कोरोनामध्ये राजकारण आणू नका, राजकारण आपलं होत जीव मात्र जनतेचा जातो. त्या जनतेच्या जिवाचा खेळ होऊ देऊ नका’, अशी विनंती यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजकारण्यांनी केली. ‘मंदिरे उघडली नाही तर आंदोलने करू, निर्बंध मागे घेतले नाही तर आंदोलने करू, असा इशारा देणाऱ्यांनी आंदोलने जरुर करा. आंदोलने झालीच पाहिजेत पण ती आंदोलने ही कोरोनाच्या विरोधात झाली पाहिजेत’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

व्हायरसमधील आय आणि यू तसे मी आणि तू असे मिळून माझे कुटुंब माझी जबाबदारी घेऊन आपण ज्या ठिकाणी राहतो त्या कुटुंबाचा आपण भाग आहोत आणि त्याची जबाबदारी एक कुटुंबप्रमुख म्हणून घ्यायला हवी. त्यात जनजागृती करा,असे मुख्यमंत्री म्हणाले.

तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. केरळ राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील सध्याची कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय यंत्रणांचे ऑडीट करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

राज्यात सव्वा लाख ऑक्सिजन बेड वाढवण्यात आले आहेत. तिसऱ्या लाटेत आवश्यकता असलेल्या सर्वांना आपण ऑक्सिजन देऊ शकतो. दुसऱ्या लाटेवेळी ८० हजार रुग्णांना ऑक्सिजन बेडची गरज होती मात्र त्यांना पुरेसा इतका ऑक्सिजन नव्हता. आजही बाराशे ते तेराशे मॅट्रिक टन ऑक्सिजन आहे. ५०० मेट्रिक टन आपल्याला इतर राज्यातून आणावा लागत होता. तो आणणे कठीण होते. यंत्रणा तेव्हा श्वास रोखून बसली होती. ते चित्र पुन्हा होऊ नये यासाठी आज चौदाशे टन मॅट्रिक टन ऑक्सिजन तयार करतोय, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


हेही वाचा – इन्फोसिसकडून नक्षलवादी, देशद्रोह्यांना मदत- आरएसएसचा आरोप

- Advertisement -