घरताज्या घडामोडीकाळ्या टोपीखालील डोक्यात मेंदू आहे की नाही? मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना सणसणीत टोला

काळ्या टोपीखालील डोक्यात मेंदू आहे की नाही? मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना सणसणीत टोला

Subscribe

राज्यात अनलॉक अंतर्गत बार आणि हॉटेल सुरु केले, मात्र मंदिरे उघडण्यात येत नव्हती. यावरुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावरुन चांगलाच गजहब उडाला होता. त्याला ठाकरेंनीही जशासतसे उत्तर दिले होते. मात्र आज दसरा मेळाव्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर तोंडसूख घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमी मेळाव्याला केलेल्या भाषणाचा हवाला देऊन ठाकरे म्हणाले की, “मोहन भागवतही काळी टोपी घालतात. त्यामुळे इतर काळी टोपी घालणाऱ्यांनी भागवत यांचे हिंदुत्वाबाबतचे विचार काळ्या टोपीखाली असलेल्या डोक्यात भरावेत.”

“आज जे हिंदुत्त्वावर आणि मंदिरे उघडली नाहीत म्हणून आम्हाला प्रश्न विचारत आहेत ते लोक बाबरी पाडली तेव्हा बिळात तोंड लपवून बसले होते. तेव्हा यांचे नाव त्यांच्या घरातल्या सदस्याखेरीज कुणालाही माहीत नव्हते. बाळासाहेब म्हणायचे माझे हिंदुत्त्व मंदिरातील घंटा बडवणारे हिंदुत्व नाही. तर दहशतवादी बडवून काढणारे हिंदुत्व आहे. आम्ही कोरोना आल्यानंतर थाळ्या वाजवून कोरोनाला पळवणारे तुमचे हिंदुत्व पाहिले. थाळ्या वाजून गेला का कोरोना? गोवंश हत्या बंदीचा कायदा केला, तेव्हा आम्ही महाराष्ट्रात तो लागू केला. मग गोव्यात गोवंश हत्या बंदी का नाही? महाराष्ट्रात गाय माता आणि बाजूला जाऊन खाता, हे कसं काय चालते.”, अशा प्रश्न उपस्थित करत ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना झापले.

- Advertisement -

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, “आज सकाळी संघाचा कार्यक्रम झाला. त्यात मोहन भागवत यांनी जे काही सांगितले ते हिंदुत्त्व तरी काळी टोपी घालणारे लोक ऐकणार की नाही. काळ्या टोपीखाली डोकं नावाचा प्रकार आहे की नाही? असे सांगताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणाचा काही मजकूर उद्धव ठाकरे यांनी वाचून दाखविला. काळ्या टोप्याखालील डोक्यात जर मेंदू असेल तर सरसंघचालक हिंदुत्त्वाबद्दल काय बोलत आहेत, ते ऐका आणि मग पत्र लिहण्याची खर्डेघशी करा.”, अशी टीका ठाकरे यांनी राज्यपालांचे नाव न घेता केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -