घरमहाराष्ट्रराजकारणातील स्पर्धा ही शत्रूंमध्ये चालणारे युद्ध नाही

राजकारणातील स्पर्धा ही शत्रूंमध्ये चालणारे युद्ध नाही

Subscribe

सरसंघचालक मोहन भागवतांनी टोचले राजकारण्यांचे कान

सद्यस्थितीत देशातील राजकारणाच्या स्तराबाबत अप्रत्यक्षपणे चिंता व्यक्त करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सर्वपक्षीय नेत्यांचे कान टोचले आहेत. सत्ताप्राप्तीसाठी प्रयत्न करणे यात नवीन काही नाही. मात्र, त्या प्रक्रियेत विवेकाचे पालन आहे. राजकारणातील स्पर्धा ही शत्रूंमध्ये चालणारे युद्ध नाही. स्पर्धा निकोप व्हायला हवी व त्यामुळे समाजात कटुता निर्माण होऊ नये. अशा स्थितीचा लाभ देशात कलह निर्माण करणारे देशविदेशातील तत्व घेतात याची जाण सर्वांनी ठेवली पाहिजे, असे परखड मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.

कोरोनाचा संसर्ग असल्याने रेशीमबाग मैदानाऐवजी डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवादरम्यान ऑनलाईन प्रबोधनादरम्यान ते बोलत होते. विविधतेत एकता ही भारताची ताकद आहे. मात्र अल्पसंख्यांक तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांमध्ये द्वेषपूर्ण गोष्टी पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. भारत तेरे टुकडे होंगे अशा घोषणा देणारे लोक या कारस्थानी मंडळींमध्ये सहभागी आहेत. शासन-प्रशासनाच्या कुठल्या निर्णयावर किंवा समाजात घडणार्‍याचांगल्या वाईट घटनांवर विरोध दर्शवत असताना राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव व सन्मान ठेवला पाहिजे. असे सरसंघचालक म्हणाले. यावेळी मंचावर विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, सहसंघचालक श्रीधर गाडगे उपस्थित होते.

- Advertisement -

हिंदूऐवजी दुसरा शब्द वापरा

फुटीरतावादी व समाजाला तोडण्याचा प्रयत्न करत असलेले तत्व जाणुनबुजून हिंदुत्वाला तिरस्कार व टीकेचा पहिला निशाणा बनवितात. हिंदू कोणताही पंथ, संप्रदाय, जाती किंवा प्रांताचा पुरस्कार करणारा नसून सर्वांना जोडणारा शब्द आहे. या शब्दावर कुणालाही आक्षेप असू शकतो. आशय सारखा असेल तर इतर शब्दांच्या उपयोगावर आम्हाला कुठलाही आक्षेप नाही, असे डॉ. मोहन भागवत यांनी प्रतिपादन केले.

मोदी सरकारची थोपटली पाठ

स्वदेशी, स्वावलंबन, नवीन शिक्षण धोरण या मुद्दयांवर सरसंघचालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारची पाठ थोपटली. शासनाचे कामकाज पारदर्शक असून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची क्षमता सरकारमध्ये आहे.
मोहन भागवत यांनी चीनचा समाचार घेत म्हटले की, कोरोनाच्या महामारीमागे चीनचं नावं येत. चीनने आपल्या सीमेवर जो व्यवहार केलाय. त्यांचा स्वभाव विस्तारवादी आहे हे सर्वांना माहित आहे. त्यांनी अनेक देशांसोबत वाद केलाय. भारताने जो काही वार त्यांच्यावर केलाय त्यानं चीन मागे हटलाय. भारतीय सेनेने चीनला धडा शिकवला. जगातल्या बाकी देशांनाही यामुळं बळ मिळाले. मात्र, आता आपल्याला सावध राहावे लागेल. कारण ते काहीही करु शकतात. आपल्याला आता सर्व गोष्टीत चीनपेक्षा ताकतवर व्हावे लागेल. शेजारी राष्ट्रांसोबत संबंध आणखी दृढ करावे लागतील. आपण सर्वांशी मैत्री, कुणाशी भांडण्याचा स्वभाव आपला नाही. मात्र आपल्या स्वभावाला आपली दुर्बलता समजणं चूक आहे. चीनला आपण जो धडा शिकवला. आपल्या तयारी वाढवावी लागेल, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

अनेक कृत्रिम गोष्टी कोरोनामुळं बंद झाल्या

संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. मात्र सावध राहणे गरजेचे आहे. नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सामाजिक, आर्थिक व्यवहार सुरु झाले आहेत. ते सुरु करावे लागतील. हे समाजाचे नवीन रूप आहे. या नव्या परिस्थितीने आपल्याला अनेक अनुभव दिले आहेत. अनेक कृत्रिम गोष्टी कोरोनामुळे बंद झाल्या. याचं काही नुकसान नाही. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. रोजगार सोडून गावी गेलेला मजूर आता परतत आहेत. परतलेल्यांना रोजगार आहेच असं नाही. त्यांना रोजगार शोधावा लागेल. कोरोनाला हरवण्याचा संकल्प करा, असं मोहन भागवत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -