घरCORONA UPDATEमुख्यमंत्र्यांच्या पुनःश्च हरीओम, मिशन बिगिन अगेनमुळे गोंधळ - फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या पुनःश्च हरीओम, मिशन बिगिन अगेनमुळे गोंधळ – फडणवीस

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “पहिल्यांदा पुनःश्च हरिओम म्हटले त्यानंतर मिशन बिगिन अगेन म्हटले तसेच दोन दिवसांपूर्वी गरज पडली तर लॉकडाऊन करावा लागेल असे म्हटले.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केलेला नाही असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केल्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून, मुख्यमंत्र्यांच्या पुनःश्च हरीओम, मिशन बिगिन अगेन या घोषणांमुळे राज्यात गोंधळ वाढल्याचे म्हटले आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “पहिल्यांदा पुनःश्च हरिओम म्हटले त्यानंतर मिशन बिगिन अगेन म्हटले तसेच दोन दिवसांपूर्वी गरज पडली तर लॉकडाऊन करावा लागेल असे म्हटले. हे सगळे गोंधळात टाकणारे असल्याचे म्हणत आता सर्व व्यवहार आपण सुरू केले, तर कोणतेही संकट आले तरी त्याला यशस्वीपणे तोंड द्यावे लागेल असे फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस हे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी दापोलीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. दरम्यान राज्यातील करोना रुग्णांची  संख्या आता लाखांवर जाईल अशा स्थितीत आपण रोज नवे उच्चांक करतो आहोत. त्यामुळे खरोखरच या समस्येकडे सरकारने अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. महाराष्ट्राला करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंवर नियंत्रण मिळवावे लागेल. यामध्ये काय उपाय योजना कराव्या लागतील त्या कराव्यात असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तर त्याची कारणे राज्यपालांना सांगावी

दरम्यान लॉकडाऊनच्या काळात परीक्षा घ्यायची की नाही हा मोठा गोंधळ राज्यात निर्माण झाला असून, राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये यावरुन वाद सुरु आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी याआधी मंत्री विद्यापीठाच्या कामात ढवळाढवळ करत नव्हते असे सांगत राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यपाल हे अत्यंत संवैधानिक पद आहे. त्या पदाचा मान राखूनच सर्वांनी बोलले पाहिजे. परीक्षा घ्यायच्या की नाही यासंदर्भात राज्य सरकारनेच स्वत: कुलगुरुंची कमिटी तयार केली. त्या कमिटीने सांगितले की, परीक्षा घेतल्या पाहिजे. कशा घ्यायच्या हेदेखील सांगितले. या सर्व व्यवस्थेचे मुख्य कुलपती म्हणजेच राज्यपाल आहेत. त्यांच्याशिवाय निर्णय घेतला जाऊ शकत नाही. तरीही मंत्र्यांनी परीक्षा घेणार नाही  हे जाहीर केले मात्र तरीही सरकारला जर परीक्षा घेतली जाऊ नये असे वाटत असेल तर त्यांनी राज्यपालांना भेटून याची कारणे सांगायला हवीत असे देखील ते यावेळी म्हणालेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -