घरCORONA UPDATEकाँग्रेस खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात; लवकरच डिस्चार्ज

काँग्रेस खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात; लवकरच डिस्चार्ज

Subscribe

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे. च्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असून तब्बल १९ दिवसांनंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसंच लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राजीव सातव यांना १९ एप्रिलला कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्यांनी २२ एप्रिलला कोरोनाची चाचणी केली असता कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. त्यांनतर २३ एप्रिलला पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, प्रकृती खालावल्याने २५ एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं होतं. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, राजीव सातव यांनी त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आणि मोठ्या हिंमतीनं कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -

खरंतर, कोरोनाची लागण झाल्यामुले सातव यांना खूप त्रास झाला. यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. उलटसुलट चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर विश्वजीत कदम यांनी जहांगीर रुग्णालयाला भेट देत सातव यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी चर्चा केली होती. त्यानंतर कदम यांनी प्रकृती स्थिर असून ते करोनाच्या जीवघेण्या संसर्गावर नक्की मात करतील अशा विश्वास व्यक्त केला होता.

राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. राजीव सातव यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन विचारपुस केली आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्वोतपरी मदत करु असं आश्वासन दिलं होतं. अखेर राजीव सातव हे कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -