घरताज्या घडामोडीठाण्यातील उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकून कंटेनर उलटला; रस्त्यावर तेल सांडल्याने वाहतुकीवर परिणाम

ठाण्यातील उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकून कंटेनर उलटला; रस्त्यावर तेल सांडल्याने वाहतुकीवर परिणाम

Subscribe

वापी,न्हावासेवाकडून गुजरातकडे जाणाऱ्या कंटेनर उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकून उलटल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड वरील पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ घडली. यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसली तरी त्या कंटेनर मधील तेल रस्त्यावर सांडल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. तातडीने तो कंटेनर बाजूला करून आणि सांडलेल्या तेलावर माती पसरवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

धारासिंग चौहान हा कंटेनर चालक सकाळीच वापी,न्हावासेवाकडून कंटेनर घेऊन घोडबंदर रोड मार्गे गुजरातकडे निघाला होता. तो कंटेनर घेऊन पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ आल्यावर त्याचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने तो दुभाजक व जवळच असलेल्या महापालिकेच्या स्ट्रीट लाईटपोलला धडकून घोडबंदर रोडवरती उलटला. याचदरम्यान घोडबंदर रोडवरती मोठया प्रमाणात तेल पसरले. या घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल, चितळसर मानपाडा आणि वाहतुकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisement -

सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. घटनास्थळी दोन हायड्रॉलिक क्रेन बोलवून त्याच्या साह्याने कंटेनर रोडच्या बाजुला करण्यात आले आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडलेल्या तेलावर प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने माती पसरविण्यात आली. त्यानंतर, जवळपास तासाभराने घोडबंदर रोड सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी घोडबंदर रोडवर वाहतुकीचे तीन तेरा वाजल्याचे पाहण्यास मिळाले.


हेही वाचा : Kaif Trolled: रोहित-द्रविडचे कौतुक केल्याने मोहम्मद कैफ ट्रोल, कोहली-शास्त्रीच्या चाहत्यांनी दिलं उत्तर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -