घरक्रीडाKaif Trolled: रोहित-द्रविडचे कौतुक केल्याने मोहम्मद कैफ ट्रोल, कोहली-शास्त्रीच्या चाहत्यांनी दिलं उत्तर

Kaif Trolled: रोहित-द्रविडचे कौतुक केल्याने मोहम्मद कैफ ट्रोल, कोहली-शास्त्रीच्या चाहत्यांनी दिलं उत्तर

Subscribe

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने श्रीलंकेविरूद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचे कौतुक केले आहे. त्यानंतर मोहम्मद कैफला क्रिकेट चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरूवात केली.

कैफने लिहिले की, टीम इंडियामध्ये सर्व काही ठीक असल्याचे दिसत आहे. केएल राहुल, रोहित, विराट कोहली, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ११ व्या स्थानासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. रोहित आणि द्रविडमुळे टीम इंडियाकडे एक विश्वविजेता संघ म्हणून पाहिलं जात आहे.

- Advertisement -

कैफने हे ट्विट करताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. सोशल मीडिया यूजर्सने कैफच्या या ट्विटचा निषेध केला आणि म्हणाले की, तुम्ही विराट कोहली आणि रवी शास्त्री यांचे योगदान इतक्या लवकर विसरलात का, ज्यामध्ये टीम इंडियाने विक्रमी विजय नोंदवला होता.

- Advertisement -

एका नेटकऱ्याने लिहिले की, रवी शास्त्रींना निराश करू नका. २०१३ पासून भारत अजिंक्य आहे. द्रविड आणि रोहितने काहीही नवीन केलेले नाहीये. एक मजबूत गोलंदाजी टीम तयार करण्याचे श्रेय कोहली आणि शास्त्रीला या दोघांकडे जाते.

कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया क्रमवारीत सातव्या स्थानावर राहून पहिल्या क्रमांकावर कशी पोहोचली. असं विराट कोहलीच्या एका चाहत्याने सांगितले. विराट आणि रवी शास्त्रींच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आधीच मजबूत बनली आहे. रोहित ज्या संघासोबत खेळत आहे तो खरंतर विराट कोहलीचा संघ आहे. कोहलीची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कसोटी क्रमवारीत कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सातव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आली, अशा प्रकारच्या विविध प्रतिक्रिया कोहलीच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.


हेही वाचा : राज्याच्या अर्थसंकल्पात एकल महिलांबाबत मांडलेला आकडा चुकीचा, यशोमती ठाकूर यांचे स्पष्टीकरण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -