घरCORONA UPDATECoronavirus : अमेझॉनच्या जंगलातील आदिवासीचा कोरोनामुळे मृत्यू

Coronavirus : अमेझॉनच्या जंगलातील आदिवासीचा कोरोनामुळे मृत्यू

Subscribe

संबंधित प्रजातीमधील हा मुलगा कोरोना संसर्गाचा पहिलाच रुग्ण होता. या जमातीमध्ये संसर्ग पसरल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अमेझॉनच्या जंगलातील यानोमामी या आदिवासी जमातीतील १५ वर्षीय मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित प्रजातीमधील हा मुलगा कोरोना संसर्गाचा पहिलाच रुग्ण होता. या जमातीमध्ये संसर्ग पसरल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा आदिवासी जमातीच्या मुलाला कोरोना संसर्ग झाल्याचे गेल्या आठवड्यात स्पष्ट झाले होते. या कोरोनाबाधित मुलाला उपचारासाठी बोआ व्हिस्टा येथील आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच्या आजाराचे योग्य निदान न झाल्याचा आणि उपचारास विलंब केल्याचा आरोप हुटुकारा संघटनेने केला आहे. या मुलामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर बऱ्याच जणांच्या संपर्कात आला होता. अशा लोकांना शोधून त्यांना विलग करण्याचे आदेश दिले आहेत.

ब्राझीलमध्ये सुमारे ८ लाख आदिवासी असून ३०० प्राचीन जमाती आहेत. यानोमामी ही जमात रंगवलेले चेहरे आणि शरीरात अनेक ठिकाणी केलेले ‘पीअर्सिंग’ (टोचणे) या वैशिष्ट्यांवरून ओळखली जाते. १९७०च्या दशकात गोवर आणि मलेरियाच्या साथीमुळे या आदिवासींचे मोठ्या संख्येने मृत्यू झाले होते.

- Advertisement -

ब्राझीलमध्ये कोरोनाच्या संसर्गाने आतापर्यंत एक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ‘वल्डोमीटर’ या संकेतस्थळाने दिली. तर २१ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. साऊ पाउलो या औद्योगिक राज्यातून कोरोनाचा संसर्ग फैलावण्यास सुरुवात झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -