घरCORONA UPDATEमुंब्रातील कोरोनाबाधित पोलिसाच्या संपर्कात आल्यामुळे जितेंद्र आव्हाड 'होम क्वारंटाइन'

मुंब्रातील कोरोनाबाधित पोलिसाच्या संपर्कात आल्यामुळे जितेंद्र आव्हाड ‘होम क्वारंटाइन’

Subscribe

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोरोना बाधित पोलिसाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली होती आणि त्याच्या संपर्कात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आले होते. आव्हाडांनी स्वतःला राहत्या घरी क्वारंटाइन करून घेतले आहे. त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तरिही खबरदारी म्हणून त्यांना घरीच क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे.

मुंब्रातील या पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतच काही पत्रकार देखील संपर्कात आले होते. त्यांनाही होम क्वारंटाइन होण्याबाबत प्रशासनाने सांगितले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -