घरट्रेंडिंगगुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सोने खरेदीवर कोरोनाचे सावट, दुकानांपेक्षा ऑनलाईन खरेदीला पसंती

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सोने खरेदीवर कोरोनाचे सावट, दुकानांपेक्षा ऑनलाईन खरेदीला पसंती

Subscribe

हिंदू नववर्षातील गुढीपाडवा हा महत्त्वाचा सण मानला जाते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन खरेदीला सर्वात जास्त पसंती दिली जाते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे गुढीपाडवा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सणांच्या दिवशी सोन्याच्या दुकानात ग्राहकांची प्रचंड गर्दी पहायला मिळते. मात्र यंदा सोन्याच्या खरेदीवर कोरोनाचे सावट आले आहे. सोन्याच्या दुकानात ग्राहकांची तुरळत गर्दी पहायला मिळाली. यंदा सोने खरेदीला ग्राहकांनी हवा तसा प्रतिसाद दिला नाही. त्याचप्रमाणे काही ग्राहकांनी ऑनलाईन सोने खरेदीलाही प्राधान्य दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा अगदी साध्या पद्धतीने साजरा करावा लागत आहे. ग्राहकांनी भरलेली सोन्याची दुकाने आज ओस दिसून आली. सराफा बाजारातही कडक निर्बंध खालून देण्यात आले आहेत. दुकानदारांनी अर्धे शटर उघडे ठेवूनच विक्री करावी लागत आहे. एका वेळी केवळ एक ते दोन ग्राहकांना दुकानात प्रवेश देण्यात येत आहे. दरवर्षी ग्राहक ज्या उत्सुकतेने सोने खरेदीसाठी येतात तसा उत्साह यंदा दिसून आला नाही. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे काही शुभ कार्य आहे तेच ग्राहक खरेदीसाठी येत आहेत, असे सराफांनी सांगितले.

- Advertisement -

त्याचप्रमाणे यंदा ग्राहकांनी ऑनलाईन सोने खरेदीला प्राधान्य दिले आहे. ग्राहक दुकानात येण्याऐवजी फोन करुन वस्तूंची ऑर्डर देत आहे. त्याचप्रमाणे व्हॉट्स Appच्या माध्यमातूनही ग्राहक सोन्याची खरेदी करत आहेत. दिलेल्या ऑर्डरप्रमाणे दुकानदार ग्राहकांना घरपोच सोन्याची ऑर्डर देत आहेत, असेही सराफांनी सांगितले.


हेही वाचा – मुंबईकरांना कोरोनाचा विसर, गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी दादर फुलमार्केटमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -