घरमहाराष्ट्रकोरोना वाढवतोय चिंता: 24 तासांत राज्यात 1115 नवीन कोरोना रुग्ण तर 9...

कोरोना वाढवतोय चिंता: 24 तासांत राज्यात 1115 नवीन कोरोना रुग्ण तर 9 जणांचा मृत्यू

Subscribe

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना संक्रमितांची भीतीदायक वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन रुग्ण समोर येत आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे 1 हजार 115 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, 9 जणांचा मृत्यूही झाला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना संक्रमितांची भीतीदायक वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन रुग्ण समोर येत आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे 1 हजार 115 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, 9 जणांचा मृत्यूही झाला आहे.( Corona is increasing the concern 1115 new corona patients and 9 deaths in the state in 24 hours )

महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 5421 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 560 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.82 टक्के असून बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे.

- Advertisement -

थर्मल स्कॅनिंग सुरु

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, राज्यात येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग सातत्याने केले जात आहे. कोरोना चाचणीसाठी 2 टक्के नमुने घेण्यात आले आहेत. दुसरीकडे, देशाची राजधानी दिल्लीतही कोरोनाच्या रुग्णांमझध्ये सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी दिल्लीत कोरोनाचे सुमारे 1 हजार नवीन रुग्ण आढळले.

मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य

कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. यामुळे मुंबई महापालिकेने तयारी सुरु केली आहे. मुंबई मगापालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. तसेच, मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना मिळणार फेलोशिप; शिंदे सरकारचा निर्णय )

सतर्क राहण्याची गरज

देशात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी कोरोनाच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राज्यांसह कोरोना लसीकरणासंदर्भात आढावा घेतला. केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांनी सांगितले की, आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार असून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. लोकांमध्ये अनावश्यकपणे भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधांचा आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना दिले आहेत.

गेल्या 24 तासांत भारतात कोरोना विषाणूचे सुमारे 8 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 40 हजार 215 झाली आहे. बुधवारी सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 5 लाख 31 हजार 16 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -