Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कुणकेरी हूडोत्सवावर कोरोनाचे सावट

कुणकेरी हूडोत्सवावर कोरोनाचे सावट

कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने होळी सणावर मर्यादा

Related Story

- Advertisement -

गत वर्षी प्रमाणे पुन्हा या वर्षीही कोरोनाचे सावट असल्याने होळीच्या आनंदावर विरजण पडले आहे. गणेशोत्सवानंतर कोकणात सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा होळीचा सण मात्र यावर्षी ही या सणावर कोरोनाचे सावट असल्याने “होळी” मर्यादित स्वरुपात साजरी करावी लागणार आहे. राज्य भरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व जिल्ह्यातील ही वाढती कोरोना रुग्ण संख्या यामुळे प्रसिद्ध कुणकेरी हुडोत्सवावर देखील मर्यादा आल्या असून ३ एप्रिल रोजी होणारा हा उत्सव शासनाच्या नियमांचे पालन करून गावकऱ्यांनी मर्यादेत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे

पारंपारिक, धार्मिक,रूढी या ग्रामीण भागात अजूनही जोपासल्या जात असल्याने हा सर्वांनाच हवाहवासा वाटणारा सण आहे. कोकणात बऱ्याच ठिकाणी हा सण काही दिवसांचा तर बंजारा समाजात आठवडाभर साजरा करण्यात येतो. हा सण साजरा करण्यासाठी बाहेर गावची कुटुंबे परत आपल्या गावी येतात. बऱ्याच ठिकाणी होळी सणानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते.

- Advertisement -

मागच्या वर्षी होळीच्या तोंडावरच कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने होळी सणावर मर्यादा आल्या होत्या परंतु, याही वर्षी कोरोनाला वर्षपूर्ती झाली अद्यापही कोरोनाचे संकट दूर झाले नसल्याने यावर्षी देखील शासनाकडून होळी सणांवर मर्यादा आल्याने होळी सण साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी रंगांची उधळण करणार्‍या या सणातील रंग फिके पडणार आहेत.

- Advertisement -