Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन श्वेता तिवारीच्या मुलीची तब्बल १३ वर्षानंतर वडिलांशी भेट

श्वेता तिवारीच्या मुलीची तब्बल १३ वर्षानंतर वडिलांशी भेट

श्वेता तिवारीच्या मुलीचे बॉलीवूडमध्ये लवकरच पदार्पण होणार आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री श्वेता तिवारी ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. श्वेता तिवारीचा तिच्या पहिल्या पतीसोबत म्हणजे राजा चौधरी यांचा घटस्फोट २००७ मध्ये झाला होता. श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांची पलक ही मुलगी असून, अवघ्या १३ वर्षानंतर राजा त्याच्या मुलीला भेटला आहे. मुलीला भेटून भावूक झालेल्या राजा चौधरीने सोशल मिडियावर एक पोस्ट टाकली आहे. श्वेता तिवारीची मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राजाने इंस्टाग्रामवर पलकसोबत फोटो शेअर करत “जीवनाचा महत्वाचा क्षण” या आशयाचे कॅप्शन राजाने लिहिले आहे. पलकला भेटण्यासाठी राजाला परवानगी नव्हती. मात्र ते दोघे व्हॉट्सपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. आम्ही एकमेकांशी सोशल मिडियाद्वारे कनेक्ट होतो मात्र, इतक्या वर्षात कधीही भेटलो नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raja Chaudhary (@rajachaudhary)

- Advertisement -

राजा चौधरी त्याच्या आईवडिलांसह मेरठमध्ये राहतो. काही कामानिमित्त तो मुंबईत आला होता. त्याने मुंबईत पलकला भेटण्यासाठी बोलावले असून त्यांनी एकमेकांशी दीड तास गप्पा मारल्या. त्यांनी घरतील वादावर कोणतीच चर्चा केली नसून, ते अंधेरीतील एका हॉटेलमध्ये एकमेकांनी भेटले. पलकने आपल्या शूटिंगमधून वेळ काढत तिच्या वडिलांसाठी वेळ दिला. पलकला भेटल्यानंतर तिच्यावर झालेले संस्काराचे श्रेय राजा चौधरी यांनी श्वेता तिवारी यांना दिली आहे. पलकला भेटण्यासाठी तिचे वडिल राजा चौधरी बऱ्याच दिवसापासून तिला भेटण्याची वाट पाहत आहेत.


हेही वाचा – सचिन वाझेंच्या ३ मालकांना एकच चिंता …फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा

- Advertisement -