Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी देशात कोरोनाचा धोका वाढला; WHOने जारी केल्या नव्या सूचना

देशात कोरोनाचा धोका वाढला; WHOने जारी केल्या नव्या सूचना

Subscribe

मुंबईसह देशभरात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चिंता व्यक्त केली आहे.

मुंबईसह देशभरात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चिंता व्यक्त केली आहे. तसेच, वाढत्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या धोक्यामुळे WHOने COVID-19 लसीकरणाबाबत नव्या सूचना केल्या आहेत. (corona return booster dose will have to be taken once again who has issued new guidelines)

जगातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. जगभरात सध्या ओमायक्रॉनच्या 800 पेक्षा अधिक सबव्हेरिएंटचा धोका आहे. भारतात ओमायक्रॉनच्या XBB 1.16 या नव्या व्हेरियंटची लाट झपाट्याने पसरत आहे.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचना

मागील 24 तासांत देशभरात 2000पेक्षा जास्त रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे वेळीच खबरदारीचे उपाय करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सुचवले आहे. वृद्ध आणि सहव्याधी असलेल्या लोकांना पुन्हा एकदा बुस्टर डोस देण्यात यावा, असेही जागतिक आरोग्य संघटनेने सूचवले आहे. बुस्टरचे दोन्ही डोस घेऊन आता जवळपास 12 महिन्यांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे वृद्ध आणि सहव्याधी असलेल्यांना खबरदारीचा उपाय म्हणून बुस्टर डोस देण्यात यावा, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाजानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाने पुन्हा एकदा जगभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोना पुन्हा एकदा धोकादायक होऊ नये यासाठी सर्व देशांनी सज्जा राहायला हवे, असेही जागतिक आरोग्य संघनेने म्हटले आहे.

अनेक देशात कोरोनाचे नव्याने संकट

अनेक देशांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. तसेच, अमेरिका आणि सिंगापूरमध्येही कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहेत. जपान कोरोनाच्या आठव्या लाटेचा सामना करतोय. तर दक्षिण कोरियात एका दिवसात 70 हजाराहून अधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत.


हेही वाचा – IIT Bombay : FIR दाखल करताना पोलिसांनी छळ केला; दर्शन सोळंकीच्या वडिलांचा आरोप

- Advertisment -