घरCORONA UPDATECoronaVirus: मिरजमध्ये शासकीय रुग्णालयच झालं कोरोना रुग्णालय!

CoronaVirus: मिरजमध्ये शासकीय रुग्णालयच झालं कोरोना रुग्णालय!

Subscribe

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागलेल्यामुळे आता मिरजमधल्या शासकीय रुग्णालयालाच कोरोना रुग्णालयात रुपांतरित करण्यात आलं आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे २४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, याची गांभीर्याने दखल घेऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. इस्लामपूर येथे अचानकपणे वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात येताच मुंबईतील जे.जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. तसेच डॉ. पल्लवी सापळे यांनी तातडीने मिरज येथे भेट देऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे तातडीने ३०० खाटांच्या कोरोना रुग्णालयात रुपांतर केले आहे. यात १५ आय.सी.यू . बेड, सिटी स्कॅन, एम.आर.आय. या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कोरोना तपासणीसाठी येत्या तीन ते चार दिवसांत तपासणी केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे.

डॉक्टर, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुरू

मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील सर्व रेसिडेंट डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, वाहन चालक आणि अन्य कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. येत्या आठवड्याभरात हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येईल, असेही अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

इस्लामपूरमध्ये कडकडीत लॉकडाऊन

सांगली जिल्ह्यात अचानक कोरोना बाधितांचा आकडा वाढू लागला असून जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीच्या इस्लामपूरमध्ये कडकडीत लॉकडाऊन पाळला जात असून पुढचे ३ दिवस इस्लामपूरमध्ये भाजीपाला आणि अन्नधान्याची दुकानं देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Corona : डोंबिवलीत आणखी एक कोरोनाग्रस्त, हॉस्पिटल कर्मचाऱ्याला लागण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -