घरCORONA UPDATECoronavirus : खासगी रुग्णालयात कोरोना व्हायरसचा उपचार महागडा!

Coronavirus : खासगी रुग्णालयात कोरोना व्हायरसचा उपचार महागडा!

Subscribe

नॅशनल हेल्थ अँथोरिटी (एनएचए)चे अधिकाऱ्यांनी सांगितले की, जवळपास १० टक्के उपचार हे खासगी रुग्णालयात सुरू आहेत.

भारतात कोरोना रुग्णांची संख्या ११ हजारातून अधिक झाली आहे. कोरोनावरील जास्त उपचार हे सरकारी रुग्णालयात केले जात आहेत. कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालये आणि आरोग्य विमा कंपन्यांची भूमिका खूप कमी आहे. नॅशनल हेल्थ अँथोरिटी (एनएचए)चे अधिकाऱ्यांनी सांगितले की, जवळपास १० टक्के उपचार हे खासगी रुग्णालयात सुरू आहेत. एनएचएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारी रुग्णालयात जास्त उपचार होण्याच्या मागील कारण म्हणजे राज्य सरकारचे लक्ष, परिक्षण, कमी खर्च हे आहे. त्यामुळे खाजगी आरोग्य सेवांसाठी निवड करणार्‍यांची संख्या कमी आहे.

तसेच आरोग्य विमा कंपन्याकडून उपचार करणाऱ्या
लोकांची संख्या २ टक्के आहे. सोमवारी जनरल इन्शुरन्स कौन्सिल (जीआयसी) ने कोविड-१९ चे जवळपास २०० दावे दाखल केेले आहेत. याशिवाय वित्त मंत्रालयाकडे १० हजार ५८६ प्रकरणे दाखल झाली आहेत. प्रायव्हेट हॉस्पिटल्स अँड नर्सिंग होम असोसिएशन यांनी सांगितले की, उपचारासाठी एक सारख्या प्रोटोकॉलवर संमती देण्यात आलेली आहे. एम्सने मागील आठवड्यात एक समिती गठण केली. रुग्णालयांमध्ये कोविड -१९ च्या उपचारासाठी असेच प्रोटोकॉल सुचवावे लागतात. तसेच जीआयसी आणि विमा कंपन्यांनी वित्त मंत्रालयाला सूचना पाठवल्या आहेत. यात असे म्हणाले की, कोविड – १९ उपचारासाठी एक सारखेच नियम तयार करणे आवश्यक आहे. सध्या खासगी रुग्णालयामध्ये कोरोना व्हायरसवरचा उपचार खर्च ४.५ लाख ते १० लाख
रुपयांपर्यंत आहे. जनरल इन्श्युरन्स कंपनीचे सीएमडी म्हणतात की, आम्ही आमच्या सूचना दिल्या आहेत. परंतु कोणतीही अपडेट मिळालेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -