घरCORONA UPDATEमत्स्य व्यवसायाला कोरोनाचा फटका; आयसीएआरने जारी केल्या सूचना

मत्स्य व्यवसायाला कोरोनाचा फटका; आयसीएआरने जारी केल्या सूचना

Subscribe

कोविड-१९ विषाणू महामारीमुळे लागू कराव्या लागलेल्या लॉकडाऊन अर्थात संपूर्ण बंदीचे देशातील मत्स्य उत्पादन आणि मत्स्यसंवर्धन क्षेत्रावर विविध प्रकारचे दुष्परिणाम झालेले दिसून येत आहेत.

भारतीय कृषी संशोधन परिषद, डीएआरई अर्थात कृषी संशोधन, शिक्षण विभाग, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांनी त्यांच्या विविध संशोधन संस्थांच्या माध्यमातून विविध उप क्षेत्रातील सर्व संबंधितांच्या जागृतीसाठी अनेक नाविन्यपूर्ण पावले उचलली आहेत. संपूर्ण जगात पसरलेल्या कोविड-१९ विषाणू महामारीमुळे लागू कराव्या लागलेल्या लॉकडाऊन अर्थात संपूर्ण बंदीचे देशातील मत्स्य उत्पादन आणि मत्स्यसंवर्धन क्षेत्रावर विविध प्रकारचे दुष्परिणाम झालेले दिसून येत आहेत.

खुल्या जल क्षेत्रातील मासेमारी, गोड्या तसेच निम-खाऱ्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन यांच्यासह मत्स्य बीज संवर्धन, मत्स्य खाद्य निर्मिती कंपन्यांचे परिचालन, मत्स्य पुरवठा आणि विपणन साखळ्या इत्यादी अनेक संबंधित यंत्रणांवर लॉकडाऊनचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. मासेमारी करणारे, मत्स्यप्रक्रिया उद्योग करणारे आणि त्यांच्या समाजाला या महामारीमुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्यामुळे आणि मत्स्यव्यवसायाच्या साखळीतील प्रत्येक घटकाला आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्यामुळे त्यांच्यावर उपजीविका अवलंबून असणाऱ्या प्रत्येकाचीच परिस्थिती चिंताजनक झाली आहे.

- Advertisement -

मासेमारी, मत्स्य संवर्धन आणि सर्व संबंधित यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्यामध्ये कोविड-१९ संसर्ग होऊ नये, यासाठी आयसीएआरने पुढाकार घेऊन मत्स्य क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून अनेक सल्ले सूचना जारी केल्या आहेत. आयसीएआर आणि कोची येथील सीआयएफटी अर्थात केंद्रीय मत्स्य तंत्रज्ञान संस्थेने मच्छिमार, मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या बोटींचे मालक, जिथे मासेमारी चालते अशी बंदरे, मासळी बाजार आणि खाऱ्या पाण्यातील माशांवर प्रक्रिया करणारे यांच्या हितासाठी सूचना जारी केल्या आहेत.

नद्या, खाड्या, तलाव तसेच इतर पाणथळ जागी मासे पकडणाऱ्या मासेमारांसाठी आयसीएआर आणि बराकपूर येथील सीआएफआरआय अर्थात केंद्रीय गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय संशोधन संस्थेने सल्ले सूचना जारी केल्या आहेत. या सल्ले सूचनांना छापील तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसिद्धी दिली जात असून राज्यांमधील मत्स्य विभाग, विकास संस्था, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसहाय्य गट तसेच समाजमाध्यमांच्या मंचांची देखील यासाठी मदत घेतली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -