घरताज्या घडामोडीCoronavirus: राज्यात ११ आणखी करोना पॉझिटिव्ह रुग्ण, आकडा ६३ वर!

Coronavirus: राज्यात ११ आणखी करोना पॉझिटिव्ह रुग्ण, आकडा ६३ वर!

Subscribe

महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्हचा आकडा आणखी वाढला असून एका रात्रीत एकूण ११ जण पॉझिटिव्ह आढळल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. यात मुंबईचे एकूण १० जण असून १ जण पुण्यातील आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील आकडा ५२ वरुन थेट ६३ वर पोहोचला आहे. यापैकी परदेशवारी केलेल्या ८ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर, तिघांना संसर्गातून करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे वारंवार रेल्वे स्थानकात गर्दी करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. सर्व मेडिकल महाविद्यालयासाठी चाचणीसाठी प्रयत्न केलं जात आहेत. शिवाय, जर गर्दी कमी न झाल्यास लोकल बंद करावी लागेल असं पुन्हा एकदा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

शुक्रवारी रात्री नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी फक्त तीन जणांना संसर्गातून व्हायरसची लागण झाली आहे. शिवाय, ६३ पैकी १३ ते १४ जणांना संसर्गातून हा आजार झालेला आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात संसर्गातून व्हायरसचे प्रादूर्भाव होण्याचे प्रमाण कमी आहे. लोकांनी कमीत कमी बाहेर पडणं गरजेचं आहे. स्वयंशिस्त पाळणे आता खूप महत्त्वाचे आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बातचित केली असता त्यांनीही लोकल ट्रेन बंद करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, जर गरज भासली तर नक्कीच जनतेच्या हितासाठी लोकल ट्रेन आणि सार्वजनिक वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल.

- Advertisement -

लवकरच मेडिकल महाविद्यालयातही चाचणी सुरू करण्यात येईल

सध्या लोक गावी जाण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे, पुण्यासारख्या ठिकाणावरुन जास्तीच्या रेल्वे देण्याचा प्रयत्न असणार आहे. शिवाय, तपासणी किट्स ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जर आकडा अशारितीने वाढला तर तपासणी करण्याची मोठ्या प्रमाणात गरज भासेल. परवानगी मिळाली तर लवकरच मेडिकल महाविद्यालयातही चाचणी सुरू करण्यात येईल. महाराष्ट्र अजून आपण दुसऱ्या टप्प्यात आहे. भारतात हा व्हायरस नव्हताच. बाहेरुन आलेल्यांमुळे हा व्हायरस भारतात आणि महाराष्ट्र, मुंबईत येत आहे. शिवाय, हा आकडा परदेशातून आलेल्या लोकांपासून वाढेल.

एसीचा वापर करू नये 

शासकीय कार्यालयांमध्ये एसीची वापर करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कारण, थंड ठिकाणी हा व्हायरस ८ तास जीवंत राहण्याचा काळ असतो. एसीतून बाहेर पडणाऱ्या हवेतून त्याचा प्रसार होऊ शकतो आणि संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. पण, कडक उन्हामध्ये व्हायरसचं आयुष्यमान कमी आहे. सरकारच्या गाईडलाईन्सनुसार सर्व घोषणा होत आहेत. आजपासून कार्यालयातील नाईट शिफ्ट बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसंच, मेडिकल गोडाऊन सुरू राहणार आहे.

- Advertisement -

२५० आयसोलेशन वॉर्डची सुविधा

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यापर्यंत सर्व सुविधा करण्यात आली आहे. सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सर्व शासकीय आणि पालिकेचे हॉस्पिटल्स, खासगी हॉस्पिटल्समध्ये अनेक बेड्स आयसोलेशनसाठी ठेवण्यात आले आहेत. साडे पाचशे व्हेटिंलेटर्सची सुविधा करण्यात आली आहे.तर, २५० आयसोलेशन वॉर्ड्स देण्यात आले आहेत. साडे सात हजार क्वॉरंटाईनसाठी सुविधा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मास्क, पीपीई किट्स या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. ठरलेल्या सर्जरी देखील पुढील ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसआरचा वेगळा कक्ष करण्यात आला आहे. प्राजक्ता लवंगकरे यांच्याअंतर्गत हा कक्ष असेल. महाराष्ट्राला इन्फोसिसकडूनही मदत केली जाणार आहे. करोनाला तोंड देण्यासाठी सरकारची पूर्ण तयारी झाली आहे.

त्यामुळे, जर प्रसार थांबवायचा असेल तर जनता कर्फ्यूचे पालन करणे गरजेचे आहे. जनतेने सार्वजनिक वाहतूक टाळावी. ज्यांना खरंच गरज आहे कामावर जाणं त्यांचं ओळखपत्र पाहून बस किंवा रेल्वेत प्रवास देता येईल का यावरही चर्चा सुरू आहेत. सर्व दुकान आणि कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. सध्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे, त्यामुळे केंद्राने आर्थिक मदत करावी असे आवाहन ही टोपे यांनी केले आहे.

जिथे गर्दी होईल ती सर्व ठिकाणे बंद करणं गरजेचे

डब्लूएचओच्या सर्व सुचनांचे पालन करावे, जिथे गर्दी होईल ती सर्व ठिकाणे बंद करणे गरजेचे आहे. करोना ही राष्ट्रीय आपत्ती असं समजून आपण आपली जबाबदारी ओळखली पाहिजे असं ही टोपे यांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – Corona Live Updates: मुंबईत १० तर पुण्यात १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळला!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -