घरताज्या घडामोडीइराणमध्ये अडकलेला जामखेड तालुक्यातील यात्रेकरू भारतात परतला

इराणमध्ये अडकलेला जामखेड तालुक्यातील यात्रेकरू भारतात परतला

Subscribe

४४ पर्यटकांना १४ दिवस जैसलमेर येथे आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

मुस्लिम समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या इराक, इराण या मुस्लीमबहुल देशांमधील धार्मिक स्थळांच्या तीर्थयात्रेवर गेलेला जामखेड तालुक्यातील तीर्थयात्रेकरू तरुण नुकताच भारतात परतला आहे. जवळा गावातील हा तरुण मागील वीस दिवसांपासून करोनामुळे इराणमध्ये अडकलेला होता. सध्या त्याला राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

तिन्ही मार्गावरची वाहतूक झाली होती ठप्प

जामखेड तालुक्यातील एक तरुण मागील महिन्यात कोल्हापूर येथील एका ट्रॅव्हल कंपनीमार्फत आखाती देशात तीर्थयात्रेसाठी गेला होता. यावेळी त्याच्यासमवेत महाराष्ट्रातील ४४ यात्रेकरू होते. दरम्यान याच काळात इराणमध्ये करोना व्हायरसची लागण मोठ्या प्रमाणात फैलावू लागल्यामुळे विदेशी पर्यटकांना इराण सरकारने सुरक्षित स्थळी ठेवले होते. इराण देशाने सर्व सीमारेषा बंद केल्या, यामुळे सागरी, हवाई तसेच जमीन या तिन्ही मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.
दरम्यान मुस्लिम राष्ट्रातील धार्मिक तीर्थस्थळांच्या भेटीसाठी भारतातून गेलेल्या तीर्थयात्रेकरुंच्या टीमने २१ फेब्रुवारी रोजी इराणमधील तेहरान प्रांतातील धार्मिक स्थळांना भेटी देऊन जियारत केली होती. त्यानंतर नजफ शहरात मुक्काम केला होता. नजफमधून करबला, काजमेन येथे ते २८ आणि २९ ला गेले होते. तसेच इराकमधील सरकारे गौसेपाक या तीर्थस्थळालाही भेट देणार होते. त्याआधी एक मार्चला भारतीय पर्यटकांचा हा चमू कोम, माशद, बुस्तम असा प्रवास करणार होता. मात्र करोनाचा फैलाव वाढू लागल्यामुळे इराण सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून भारतीय पर्यटकांना सुरक्षित स्थळी ठेवले होते.

- Advertisement -

मायदेशी परतल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण

इराणमध्ये अडकलेल्या भारतीय यात्रेकरुंना भारतात सुरक्षितपणे परत आणण्यासाठी भारत सरकार सतत इराणच्या संपर्कात होते. भारत सरकारच्या पाठपुराव्याला अखेर यश आले. रविवारी १४ मार्च रोजी भारतीय पर्यटकांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कुणीच पॉझिटीव्ह आढळून आले नाहीत. यामुळे त्यांना भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. भारतात १५ मार्च रोजी पहाटे ४५ भारतीय पर्यटकांना दिल्लीत आणण्यात आले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून या पर्यटकांना राजस्थान मधील जैसलमेर या ठिकाणी विशेष विमानाने हलवण्यात आले आहे. या ठिकाणी या पर्यटकांना १४ दिवस ठेवले जाणार आहे. या काळात आरोग्य विभागाची त्यांच्यावर करडी नजर असणार आहे. या काळात वेगवेगळ्या तपासण्यांचे अहवाल आल्यानंतरच पर्यटकांना आपापल्या घरी सोडले जाणार आहे. मुस्लिम देशातील धार्मिक तिर्थस्थळांच्या यात्रेवर गेलेले भारतीय पर्यटक मायदेशी परतल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.


हेही वाचा – Coronavirus: देशात करोनाचा चौथा बळी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -