घरताज्या घडामोडीआयसोलेशन, क्वॉरंटाईनमधल्या रुग्णांची चांगली काळजी घेतली जातेय - गृहमंत्री

आयसोलेशन, क्वॉरंटाईनमधल्या रुग्णांची चांगली काळजी घेतली जातेय – गृहमंत्री

Subscribe

क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आलेले संशयित रुग्ण पळून जाण्याच्या काही घटना समोर आल्या असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘क्वॉरंटाईन आणि आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या रुग्णांची चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जात आहे’, अशी माहिती दिली आहे. असं असून देखील जे पळून जाण्याचा प्रकार करतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले. दरम्यान, ‘करोना हे फार मोठं आव्हान आहे. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. लोकांनी गर्दी टाळायला हवी. महत्त्वाचं काम असेल, तरच घराबाहेर पडावं. प्रवास टाळावा. जितक्या वेळा हात धुता येतील, तितक्या वेळा धुवावेत. नाकाला, तोंडाला हात लावू नयेत. चुकीच्या बातम्या किंवा अफवा पसरवू नयेत. व्हॉट्सअॅपवर चुकीच्या अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर क्राईमच्या माध्यमातून कारवाई केली आहे’, असं देखील अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं.


वाचा सविस्तर – पळून जाणाऱ्यांवर कारवाई करणार-अनिल देशमुख

‘अनेकांना आयसोलेशन आणि क्वॉरंटाईनमध्ये ठेवलं आहे. अशा लोकांनी तिथे राहायला हवं. काहींनी आयसोलेशनमधून पळून जाण्याचे प्रकार घडले होते. त्यासंदर्भात आता पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईसारख्या शहरात लोकलमधून मोठ्या संख्येनं प्रवासी प्रवास करतात. तो प्रवास टाळायला हवा. तिथे संसर्ग होण्याचा धोका असतो. नागपूरमध्ये दारूची दुकानं, बार, हॉटेल, क्लब या सगळ्यांना बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत’, असंही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.

- Advertisement -

व्हेंटिलेटर्ससाठी निधी उपलब्ध

दरम्यान, रुग्णालयातील कमी पडणाऱ्या व्हेंटिलेटर्सवर देखील गृहमंत्र्यांनी यावेळी भूमिका मांडली. ‘पोलीस, फूड अॅण्ड ड्रग, रेल्वे विभाग, आरोग्य विभाग हे समन्वयाने काम करत आहेत. हॉस्पिटल्सना व्हेंटिलेटर्स घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आयसोलेशन किंवा क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या रुग्णांची चांगल्या पद्धतीने काळजी घेण्यात येत आहे’, असं ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -