घरमहाराष्ट्रनाशिककपलिंग तुटली आणि अर्धी गाडी निघून गेली पुढे

कपलिंग तुटली आणि अर्धी गाडी निघून गेली पुढे

Subscribe

जनशताब्दी एक्सप्रेस घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली

मनमाड : काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय गुरुवारी (दि. २९) जनशताब्दी एक्सप्रेसच्या शेकडो प्रवाशांना मनमाड रेल्वे स्थानकावर आला. जालन्याहून मुबईकडे गाडी जात असताना एका डब्याची कपलिंग बेअरिंग तुटली होती. गाडी सुरु झाल्यावर कपलिंग तुटून अर्धी गाडी पुढे निघून गेली होती. वेळीच हा प्रकार लक्षात आल्यानंतर गाडी थांबाविण्यात आली आणि कपलिंग तुटलेला डबा काढून त्याच्या जागी दुसरा डबा जोडण्यात आल्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली. या घटनेमुळे दोन तास गाडीचा खोळंबा झाला होता.

त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. गाडी धावत असताना जर कपलिंग तुटली असती तर मोठी दुर्घटना झाली असती मात्र सुदैवाने रेल्वे स्थानकावर कपलिंग तुटल्यामुळे पुढील अनर्थ टळून गाडीतील प्रवाशांचा जीव वाचला. याबाबत रेल्वेसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १२०७६ अप जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान मनमाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅट फार्म क्र.५ वर आली.

- Advertisement -

सुमारे १० मिनटांनंतर गाडी मुंबईकडे जाण्यास निघाली असता मधोमध असलेल्या डी-११ या आरक्षित डब्याची कपलिंग बेअरिंग तुटली. त्यामुळे काही पुढचे डबे घेऊन गाडी काही अंतरावर गेली.मात्र वेळीच हा प्रकार लक्षात आल्यानंतर गाडी थांबाविण्यात आली आणि कपलिंग तुटलेला डबा काढून त्याच्या जागी दुसरा डबा जोडण्यात आल्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली. या घटनेमुळे तब्बल दोन तास गाडीचा रेल्वे स्थानकावर खोळंबा झाला. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला असला तरी गाडी धावत असताना जर कपलिंग तुटली असती तर मोठी दुर्घटना झाली असती. मात्र सुदैवाने रेल्वे स्थानकावर कपलिंग तुटल्यामुळे पुढील अनर्थ टळून गाडीतील प्रवाशांचा जीव वाचला असल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -