घरताज्या घडामोडीकिरण गोसावीला न्यायालयाचा दिलासा नाहीच, पोलीस कोठडी आणखी ३ दिवसांची वाढ

किरण गोसावीला न्यायालयाचा दिलासा नाहीच, पोलीस कोठडी आणखी ३ दिवसांची वाढ

Subscribe

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील कारवाईत प्रमुख पंच असलेला किरण गोसावी सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. किरण गोसावी पोलीस कोठडीत असून त्याला फसवणूक केल्याच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात असलेला पंच किरण गोसावी याच्या पोलीस कोठडीमध्ये शिवाजी नगर कोर्टाने २ दिवसांची वाढ केली आहे. यामुळे ८ ऑक्टोबरपर्यंत किरण गोसावी पोलीस कोठडीतच राहील. किरण गोसावी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या सोबत होता. तर यापुर्वीच किरण गोसावी याच्यावर फसवणूकीचे गुन्हे दाखल असून तो फरार होता.

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक करुन एनसीबी कार्यालयात किरण गोसावी घेऊन गेला होता. यानंतर किरण गोसावी फरार झाला होता. गोसावीवर फसवणूक केली असल्याचे गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यांचा तपास पुणे पोलिसांकडून सुरु होता. पुणे पोलिसांना सुरुवातीला किरण गोसावी सापडला नाही. मात्र पुण्यात एका ठीकाणी गोसावी असल्याची पुणे पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गोसावीला अटक करण्यात आली आहे. गोसावीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस होता यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.

- Advertisement -

किरण गोसावीला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले होते. परंतु गोसावीचा सायबर गुन्ह्यातही सहभाग असल्याची शक्यता आहे. यामुळे न्यायालयाने किरण गोसावीची ३ दिवस पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. किरण गोसावीवर पुण्यात ४ तर राज्यात इतर भागात ५ गुन्हे दाखल झाले आहेत. गोसावीच्या सहकाऱ्यांचाही पोलिसांकडून शोध सुरु आहे.

किरण गोसावीवर आरोप कोणता?

पुणे पोलिसांनी किरण गोसावीला फसवणूक केल्या प्रकरणी अटक केली आहे. परदेशात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून फसवणूक केली असल्यामुळे गोसावीला अटक करण्यात आली आहे. २०१८ मध्ये पुण्यातील एका तरुणाला मलेशियात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले होते. तरुणाकडून तीन लाख रुपयेही गोसावीने घेतले होते. मात्र नोकरी लावली नसल्यामुळे तरुणाने पुणे पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

- Advertisement -

हेही वाचा : Aryan Khan:आर्यन खान एनसीबी कार्यालयात हजर 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -