घरक्राइमAryan Khan:आर्यन खान एनसीबी कार्यालयात हजर

Aryan Khan:आर्यन खान एनसीबी कार्यालयात हजर

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan)जामीनानंतर पहिल्यांदाच एनसीबी (NCB)कार्यालयात हजेरी लावण्यासाठी पोहचला आहे. आर्यन खानला २७ ऑक्टोबर रोजी जामीन दिल्यावर त्याची २९ ऑक्टोबर रोजी तुरुंगातून सुटका झाली आहे. आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली आहे.(Aryan Khan appears before Narcotics Control Bureau)

2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूजवर छापेमारी केली होती.या छापेमारीत आर्यन खानसह इतर काही जणांना देखील अटक करण्यात आली होती. एनसीबीकडून अटक झाल्यानंतर तब्बल 27 दिवसानंतर आर्यन तुरूंगातून बाहेर आला होता.ठराविक अटी शर्थींसह तसेच १ लाख रूपयांच्या बॉंडवर आर्यनचा जामीन हायकोर्टाने मंजुर केला होता. आर्यनच्या सुटकेनंतर तरुंगाबाहेर तसेच शाहरुखच्या घराबाहेर चाहत्यांनी दिवाळी साजरी केली होती.

- Advertisement -

एनसीबीने क्रूझवर जेव्हा छापेमारी केली तेव्हा आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंटसह नंतर या सातही जणांना अटक केली होती. मात्र सातही जणांच्या जामीन अर्जावर विशेष एनडीपीएस कोर्टात सुनावणी झाली यावेळी न्यायमूर्ती वैभव पाटील यांनी जामीन मंजूर केला.

- Advertisement -

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने कोर्टात सादर केलेल्या माहितीनुसार, पार्टीतून १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या २२ गोळ्या जप्त केल्या होत्या त्याचबरोबर १ लाख ३३ हजार रुपये रोख सुद्धा क्रुझवर एनसीबीने जप्त केले.


हे हि वाचा –  Diwali 2021 : बंदी घातलेल्या बेरीयम सॉल्ट रसायन मिश्रीत फटाक्यांचा साठा जप्त

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -