घरमहाराष्ट्रनीट उभे राहा, हातवारे करू नका; अर्णब गोस्वामी यांना न्यायालयाने खडसावलं

नीट उभे राहा, हातवारे करू नका; अर्णब गोस्वामी यांना न्यायालयाने खडसावलं

Subscribe

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक केली. पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयासमोर सादर केले. न्यायालयात अर्णब गोस्वामी यांनी रायगड पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला. तेव्हा सांगताना अर्णब गोस्वामी हातवारे करत सांगत न्यायाधीशांना सांगत होता. तेव्हा न्यायाधीशांनी अर्णब गोस्वामीला चांगलेच खडसावले.

अर्णब गोस्वामींना न्यायालयात हजर केले तेव्हा अर्णब गोस्वामींनी रायगड पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला. तेव्हा न्यायाधीशांनी गोस्वामी यांची फेर वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुन्हा एकदा गोस्वामींच्या आरोपावर न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी सुरू झाल्यानंतर गोस्वामी यांनी कोर्टाच्या बाहेर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. त्यानंतर ते न्यायालयात गेले, तेव्हा ते काही हातवारे, तसेच इशारे करत होते. त्यांचे हे वर्तन पाहून न्यायाधीश भडकले आणि त्यांनी अर्णब गोस्वामी यांनी ‘तुम्ही नीट उभे राहा, हातवारे करू नका,’ अशा शब्दांत खडसावले.

- Advertisement -

त्यानंतर अर्णब गोस्वामी यांचे न्यायालयातील वागणे बदलले आणि ते शांत बसून सुनावणी ऐकत होते. मारहाण केल्याचा गोस्वामी यांचा आरोप पोलिसांनी फेटाळून लावला. त्यानंतर त्यांच्या रिमांड अर्जावर सुनावणी सुरू झाली. न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


हेही वाचा – अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -