घरमहाराष्ट्रआयआयटीयन्स माजी विद्यार्थ्यांनी बनवली कोविड लॅब बस

आयआयटीयन्स माजी विद्यार्थ्यांनी बनवली कोविड लॅब बस

Subscribe

जेनेटिक टेस्टिंग, नमुने घेणे, टेलिरेडिओलॉजीची सुविधा

देशात पसरत असलेल्या करोनाचा सामना करण्यासाठी सर्वच प्रयत्न करत असताना आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी कोविड १९ टेस्ट बस तयार केली आहे. ही बस देशातील पहिली कोविड १९ टेस्ट बस ठरली आहे. यामध्ये जेनेटिक टेस्टिंग, कोणत्याही संपर्काशिवाय स्वॅब नमुने घेणे, डिजिटल एक्स-रे, टेलिरेडिओलॉजीची सुविधा आहे.

आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी बनवलेली कोविड-१९ टेस्ट बस ही पूर्णतः भारतीय तंत्रज्ञानाने बनवण्यात आली आहे. बसमधील लॅबमध्ये अशाप्रकारची सुविधा असलेली ही जगातील पहिली लॅब ठरली आहे. कोविड टेक्नॉलॉजी आणि आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ही बस बनवली आहे.

- Advertisement -

या बसमध्ये ३८४ स्क्वेअर फूट लॅब उभारण्यात आली आहे. ही लॅब पावसाळ्यातही वापरता येणार आहे. या बसमध्ये रोबोटीक अल्ट्रा साऊंड सिस्टीम बसवण्यात आली आहे. या बस लॅबची प्रत्येक महिन्याला ५० लाख चाचण्या करण्याची क्षमता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -