घरताज्या घडामोडीLive Update: राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव असावं, मुख्यमंत्र्यांचा संकल्प

Live Update: राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव असावं, मुख्यमंत्र्यांचा संकल्प

Subscribe

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव असावं, मुख्यमंत्र्यांचा संकल्प

मराठी भाषा आणि गौरव दिनानिमित्त राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव निर्माण करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकल्प केला आहे. तसेच परदेशात असलात तरी मराठी भाषेचा अभिमान बाळगा आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला अभिमान असावा असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कौटुंबिक लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आज मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. या भेटी दरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मा.राजसाहेब ठाकरे यांना राजमुद्रा भेट दिली. छत्रपती उदयनराजे हे पहिल्यांदाच कृष्णकुंजवर आल्याने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सन्मान केला.

- Advertisement -

udyan raje bhosale and raj thackeray


संजय राठोडांच्या राजीनाम्या संदर्भात शिवसेना मंत्र्यांची तातडीची बैठक

शिवसेना नेत्यांची आज (२७ फेब्रुवारी) संध्याकाली ६.३० वाजता महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यासंदर्भात ही बैठक बोलावली असल्याचे समजते आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा येथे ही बैठक होणार आहे.


पोलिसांनी जप्ती केलेल्या गाड्यांना भीषण आग, अनेक गाड्या जळून खाक

पुणे जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या गाड्यांना भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. पोलिसांनी कारावई करत या गाड्या जप्त केल्या होत्या. आगीत काही गाड्या भस्मसात झाल्या असल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.


संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अन्यथा विधान भवनात तोंड उघडू देणार नाही

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे कारवाई करत त्यांना अडणीत टाकण्याचा प्रयत्न सरकारद्वारे केले जात आहे. असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर कारवाई केली नाही त्यांचा राजीनामा घेतला नाहीतर विधान भवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही तसचे सरकारला बाकीचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

तर विधान भवनात तोंड उघडू देणार नाही, चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा


मनसेच्या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात; राज ठाकरेंची उपस्थिती


बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लतादीदींनी मराठीत स्वाक्षरी करून पाठवली


मनसे मराठी स्वाक्षरी मोहिमेकरता सज्ज

मराठी भाषा दिनानिमित्त मनसेने मराठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेला पोलिसांनी नकार दिला आहे. तसेच मनसे नेते अमेय खोपकर यांना नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी मनसे मराठी स्वाक्षरी मोहिमे करणार, असे ठाम मत मनसे नेते संदिप देशपांडे यांनी एका मराठी वृत्तवाहिनेला देताना मांडले आहे. त्याचप्रमाणे मराठी स्वाक्षरी मोहिमेकरता मनसे सज्ज झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -