घरट्रेंडिंगमराठी भाषा दिन: राज ठाकरे म्हणतात...दीदी मी खरंच तुमचा ऋणी आहे

मराठी भाषा दिन: राज ठाकरे म्हणतात…दीदी मी खरंच तुमचा ऋणी आहे

Subscribe

२७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्ताने ‘मराठी भाषा दिन’ साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीपणाची ओळख ठसवण्यासाठी मराठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले आहे. या आवाहनाला भारताच्या गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर अर्थात लता दीदी यांनी देखील सहभाग घेतला आहे. त्यांनी आपली मराठी स्वाक्षरी करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवली आहे. यावर राज ठाकरे यांनी ‘दीदी मी खरंच तुमचा ऋणी’, असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

दीदींना राज ठाकरे असं का म्हणाले?

मराठी भाषा दिनानिमित्त मनसेने मराठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेमध्ये लता मंगेशकर यांनी देखील सहभाग घेत संत ज्ञानेश्वरांचे उषाताई मंगेशकर यांनी रेखाटलेले चित्र पाठवले. विशेष म्हणजे यावर लता मंगेशकर यांनी आपली स्वाक्षरी पाठवत मराठी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपण दीदींचे ऋणी असल्याचे म्हटले.

काय म्हणाले राज ठाकरे?

‘मराठी स्वाक्षरी करायला हवी या आवाहनावर लतादीदींनी मराठीत स्वाक्षरी करून पाठवली आणि सोबत कुसुमाग्रजांसोबतचा फोटो देखील. दीदी मी खरंच तुमचा ऋणी आहे. स्वाक्षरीच्या शेजारी दिसणारं संत ज्ञानेश्वरांचं चित्र उषाताई मंगेशकरांनी रेखाटलं आहे’.

- Advertisement -

हेही वाचा – मराठीच्या ‘अभिजात’चे काय?


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -