घरक्राइमCrime In Mumbai : बलात्कार, विनयभंगाभोवतीच फिरतेय मुंबईतील गुन्हेगारी

Crime In Mumbai : बलात्कार, विनयभंगाभोवतीच फिरतेय मुंबईतील गुन्हेगारी

Subscribe

90 च्या दशकात आलेला सत्या चित्रपट तुम्ही आम्ही सगळ्यांनीच पाहला असेल. रोजगारासाठी मुंबईत दाखल झालेले काही रोजगार कसे वाम मार्गाला लागतात आणि गुन्हेविश्वात अडकतात. यातून वाढतेय ती मुंबईतील गुन्हेगारी.

मुंबई : मायानगरी मुंबई म्हणजे रात्रीच्या अंधारात झगमगणारी चंदेरी दुनियाच. एकीकडे उंच इमारती तर दुसरीकडे झोपडपट्टीतील जीणं. अशा दोन दरीत विभागलेल्या याच मुंबईला गुन्हेगारीचा मोठा इतिहास आहे. आज ती टोळीयुद्धाची गुन्हेगारी जरी दिसत नसली तरी याच मुंबईतील गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाही. दरम्यान मागील सात महिन्यांचा गुन्हेगारीचा आढावा घेतला असता मुंबईत जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत खुन, खुनाचे प्रयत्न असे अनेक गुन्हे घडले जरी असले तर मायानगरी मुंबईतील गुन्हेगारी हे महिलांची छळवणुकी भोवतीच फिरत असल्याचे दिसून ते आहे. कारण, मागील सात महिन्यांत बलात्काराचे 565 तर विनयभंगाचे 1 हजार 246 प्रकरणे घडल्याचे दिसून येत आहे.(Crime In Mumbai Crime in Mumbai revolves around rape, molestation)

90 च्या दशकात आलेला सत्या चित्रपट तुम्ही आम्ही सगळ्यांनीच पाहला असेल. रोजगारासाठी मुंबईत दाखल झालेले काही रोजगार कसे वाम मार्गाला लागतात आणि गुन्हेविश्वात अडकतात. यातून वाढतेय ती मुंबईतील गुन्हेगारी. सध्या जरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हेगारीला आळा बसत असला तरी मागील 7 महिन्यांत याच मुंबईत अनेक गुन्हे घडले आहेत. मागील यामध्ये सर्वाधिक प्रकरणे ही महिलासंबंधी असून, महिलांची होणारी छळवणूक रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

- Advertisement -

हेही वाचा : धक्कादायक: जावेचा गर्भपात करण्यासाठी केला जादूटोणा

565 बलात्कार तर 1246 विनयभंगाची नोंद

मुंबई शहर आणि परिसरात घडत असलेल्या लहान मोठ्या गुन्ह्यांसोबतच याच सात महिन्यांत मुंबईतील विविध पोलीस स्टेशनमध्ये 565 बलात्कार तर 1246 विनयभंगाच्या घटनांची नोंद पोलीस दफ्तरी झाली आहे. असे जरी असले तरी बलात्काराच्या 100 टक्के घटनापैकी तब्बल 93 टक्के घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. तर 1246 विनयभंगाच्या घटनापैकी 90 टक्के घटना पोलिसांनी उघडकीस आणून महिलांना न्याय मिळून दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Pune Crime : ‘गदर-2’चा शो अखेरचा ठरला; चित्रपटगृहाबाहेर येताच तरुणाची तलवार, कोयत्याने वार करून हत्या

सात महिन्यांत 76 मर्डर

मुंबईतील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील सात महिन्यांत 76 खुनाच्या घटना घडल्या आहेत. तर तब्बल 150 घटना या खुनाच्या प्रयत्नाच्या आहेत. खुनाच्या एकुण 76 घटनांपैकी 73 खुनाचे प्रकरणे पोलिसांनी उघडकीस आणून आरोपींना अटक करत त्यांना जेलची हवा दाखवली आहे. तर खुनाच्या प्रयत्नांतील 150 घटनांचा तपास हा 99 टक्के एवढा आहे.

चेन स्नॅचिंगच्या घटनांनी गाठला कळस

महिलांना एकटे पाहून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काडणे हे प्रकार आजही मुंबईत सर्रास घडत असल्याचे मागील सात महिन्यांच्या आकडेवारीवरुन अधोरेखीत होत असल्याचे दिसून येत आहे. कारण, जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत चेन स्नॅचिंगच्या 71 घटना घडल्या असून, यापैकी केवळ 65 प्रकरणांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -