घरमहाराष्ट्रसुप्रीम कोर्टात महाभकास आघाडीला आरक्षण टिकवता आले नाही

सुप्रीम कोर्टात महाभकास आघाडीला आरक्षण टिकवता आले नाही

Subscribe

महाराष्ट्राच्या इतिहासातील मराठा समाजाच्या आयुष्यातला हा काळा दिवस आहे. महाभकास आघाडीला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आले नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.

- Advertisement -

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आमच्या सरकारने आरक्षण दिले. आरक्षण काही महिन्यांसाठी टिकले; पण नंतर स्थगिती मिळाली. आमच्या सरकारमध्ये कायमस्वरूपी मराठा आरक्षण टिकण्यासाठीचे प्रयत्न झाले. आम्ही शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये आरक्षण दिले. मात्र, महाभकास आघाडीला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आले नाही, असे चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे.

खंडपीठाकडे दिलेला विषय पूर्णच होत नाही त्यामुळे तात्पुरती स्थगिती नाही. आम्ही सरकारला सांगत होतो की जरा गांभीर्याने या प्रकरणाकडे लक्ष द्या. पण अशोक चव्हाण यांना ते काही जमलं नाही. सरकारने स्थगिती घेऊन स्वतःवर कुर्‍हाड मारून घेतली. दहा टक्के आर्थिक आरक्षण खंडपीठाकडे गेले पण स्थगिती नाही, तामिळनाडूत आरक्षणाला स्थगिती नाही. मग आपल्या सरकारला हे का नाही जमले? उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यापैकी कुणी या विषयाकडे लक्ष का दिले नाही? आम्ही स्वस्त बसणार नाही. या सरकारला आरक्षण टिकवता आले नाही हे करंटे आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -