घरमहाराष्ट्रफसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रारी कराव्यात - मिलिंद पवार

फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रारी कराव्यात – मिलिंद पवार

Subscribe

ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहकांनी या मंचाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष मिलिंद पवार यांनी आज केले.

ग्राहकांना कमी खर्चात व कमी वेळेत न्याय मिळावा यासाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच आहे. या मंचाचे संपूर्ण कामकाज हे मराठी चालते. ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहकांनी या मंचाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष मिलिंद पवार यांनी आज केले. जिल्हा‍धिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. प्रारंभी स्वामी विवेकानंद याच्या प्रमिेचे पुजन करुन सातारा येथील कन्या शाळेतील विद्यार्थींनी जागो ग्राहक जागो या विषयी सुंदर पथनाट्य सादर केले.

सरक्षणाचा कायदा अस्तित्वात आहे

ग्राहकांनी कोणतीही वस्तु खरेदी केल्यास पक्की पावती घ्यावी, असे सांगून पवार पुढे म्हणाले, ग्राहकांच्या हितासाठी २४ डिसेंबर १९८६ ला ग्राहक सरंक्षण कायदा अस्तित्वात आला. हा कायदानुसार ग्राहकांना अधिकार देण्यात आले आहेत. ग्राहक मंचाकडे एखादी तक्रार प्राप्त झाल्यास ९० दिवसात त्या तक्रारीचा निपटारा करण्याचा आमचा प्रयत्न असतो. तक्रारदाराला वकीलच द्यावा असे नाही तो स्वत:ची केस स्वत: लढू शकतो. सर्वांनी एकत्र येवून ग्राहक संरक्षण कायद्याच्या जनजागृतीसाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवानही मिलिंद पवार यांनी शेवटी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -