घरमहाराष्ट्रकोकणात पावसाचे धुमशान, जगबुडीने ओलांडली धोका पातळी

कोकणात पावसाचे धुमशान, जगबुडीने ओलांडली धोका पातळी

Subscribe

कोकणात रविवार रात्रीपासून मुसळधार सुरू आहे. कोकण विभागात शनिवारपर्यंत अतिमुसळधार पवासाची शक्यात वर्तवण्यात आली आहे.

कोकणात रविवार रात्रीपासून मुसळधार सुरू आहे. कोकण विभागात शनिवारपर्यंत अतिमुसळधार पवासाची शक्यात वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांनी रौद्ररुप धारण केले आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नागिरकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्हयात दक्षिण रत्नागिरी येथील लांजा, राजापूर येथे तर उत्तर रत्नागिरीतील दापोली, खेड, गुहागर येथे दिवसभर झालेल्या तूफान पावसामुळे पाणी साचले आहे. तर, काही ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकारही घडले आहेत. कोकणात मुसळधार पाऊस पाहता राज्य सरकारने  एनडीआरएफच्या तुकड्या रत्नागिरी जिल्ह्यात पाठवण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या इशार पातळीवर –

रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांनी इशारा पातळी ओलांडण्यास सुरुवात केली आहे. रात्री एकच्या सूमारास खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. तर चिपळूण येथील वशिष्ठी नदी आमि राजापूर येथील कोदवली नदी इशारा पातळीवर आहे. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खेड, राजापूर, चिपळूण अलर्ट मोडवर आहेत.

- Advertisement -

रायगड जिल्ह्यातील २३ गावच्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविले –

दरम्यान राजापूर तालुक्यातील पाचल कोंडवाडी येथील अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांची पेरलेले धान वाहून गेले. तर घाट मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. राजापूर धोपेश्वर भागात डोंगर खचल्याने पायथ्याशी असलेल्या ३६ कुटुंबांतील १५० व्यक्तींना स्थलांतरित होण्याच्या नोटिसा प्रशासनाने दिल्या आहेत. चिपळूणजवळच्या परशुराम घाटातील वाहतूक अजूनही बंद आहे. रायगड जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावल्याने २३ गावांतील १५३५ रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -