घरमनोरंजनसत्य नेहमी कटू असतं..., नदव लॅपिडच्या वादग्रस्त वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया

सत्य नेहमी कटू असतं…, नदव लॅपिडच्या वादग्रस्त वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया

Subscribe

सध्या गोव्यात सुरु असणारा ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ चांगलाच चर्चेत आहे. यामध्ये IFFI 2022 चे प्रमुख परिक्षक नदव लॅपिडने या चित्रपट महोत्सवात ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर निशाणा साधला होता. तसेच या चित्रपटाबाबत काही वादग्रस्त वक्तव्य देखील केली. त्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी त्यांच्या टीका करु लागले आहेत. दरम्यान, आता ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील नदव लॅपिडला खडेबोल सुनावले आहेत.

काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?

- Advertisement -

IFFI 2022 चे प्रमुख परिक्षक नदव लॅपिडच्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अनेकजण टिका करु लागले आहेत. अभिनेते अनुपम खेर यांनी देखील या वक्तव्यावर आपलं मत व्यक्त केलं. दरम्यान, आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी देखील आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिलंय की, “सत्य नेहमी कटू असतं. हे लोकांकडून खोटं बोलून घेऊ शकतात.”

नदव लॅपिडचं वादग्रस्त वक्तव्य

- Advertisement -

IFFI 2022 महोत्सवात इस्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांना प्रमुख परिक्षक म्हणून होते. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर चांगलाच निशाणा साधला. त्यावेळी ते म्हणाले की, या महोत्सवातील 15 वा चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ पाहून आम्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. आम्ही खूप निराश आहोत. आम्हाला वाटते की हा चित्रपट एका विशिष्ट विचारांचा प्रचार करणारा आणि असभ्य आहे. एवढ्या मोठ्या महोत्सवात या चित्रपटाला स्थान मिळणं चूकीचं आहे.”

 

 


हेही वाचा :

‘द काश्मीर फाईल्स’ व्हल्गर चित्रपट… IFFIच्या परीक्षकांची टीका

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -