घरमहाराष्ट्रराज्यात कोरोना मृतांच्या संख्येत घट

राज्यात कोरोना मृतांच्या संख्येत घट

Subscribe

राज्यात ९१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत होत असलेल्या मृत्यूंच्या संख्येमध्ये बुधवारीची संख्या फारच कमी आहे.

राज्यात ६,७३८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६,६०,७६६ झाली आहे. राज्यात १,२९,७४६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ९१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत होत असलेल्या मृत्यूंच्या संख्येमध्ये बुधवारीची संख्या फारच कमी आहे. मृतांची संख्या ४३,५५४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे.

राज्यात ९१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई, ३१, ठाणे १, नवी मुंबई मनपा १, भिवंडी निजामपूर मनपा २, पालघर २, नाशिक ५, अहमदनगर २, जळगाव २, पुणे ४, पिंपरी चिंचवड मनपा ३, सोलापूर ४, कोल्हापूर ३, नागपूर १० यांचा समावेश आहे. आज ८,४३० रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १४,८६,९२६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.५३ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७,६८,८७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,६०,७६६ (१८.९४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,२८,५४४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,९८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -