घरक्राइममॉडेलची केली हत्या; मोबाईल लॉक उघडण्यासाठी अंगठा कापून नेला

मॉडेलची केली हत्या; मोबाईल लॉक उघडण्यासाठी अंगठा कापून नेला

Subscribe

एक रशियन वैज्ञानिक आणि पार्टटाइम मॉडेल तिच्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत सापडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मारेकऱ्याने हाताचा अंगठा कापून सोबत घेऊन गेला. तिचा फोन वापरण्यासाठी, मारेकऱ्याने तिचा अंगठा कापला. अंगठ्यामुळे फिंगर प्रिंट सेन्सर लॉक उघडता येऊ शकेल. यासाठी त्याने अंगठा नेला. द सनच्या वृत्तानुसार, संशयिताच्या घरी मृत महिलेचा अंगठा सापडला.

सेंट पीटर्सबर्ग टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधील बायोकेमिस्ट, ३४ वर्षीय एकटेरिना अँटोंटसेवाचा मृत नग्न शरीर तिचा प्रियकर जेव्हा ट्रिपमधून परत आला तेव्हा त्याने पाहिला. द सनच्या वृत्तानुसार, संशयिताची ओळख एट्रोम नावाचा कंप्युटर गेमर म्हणून झाली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलम आहे. त्याचा डिलिट झालेला संदेश पुन्हा पाठविण्यासाठी त्याने अंगठा कापला असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

अहवालानुसार तपास करणाऱ्यांनी मृत अँटोंटसेवा हिच्या खात्यातून पैसे चोरी करण्यासाठी हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. अँटोंटसेवाच्या शरिराचा वास येऊ नये यासाठी मारेकऱ्याने आतल्या खिडक्या आणि दारे सील केली होती. मायक्रोबायोलॉजिकल सिंथेसिस टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. मार्क शमत्स्यान म्हणाले, “शास्त्रज्ञाच्या हत्येबद्दल आम्ही सर्वजण शोक व्यक्त करत आहोत. ती एक चांगली व्यक्ती होती, खूप दयाळू. आम्ही सर्वांनी तीच्यावर प्रेम करत होतो आणि तिचा आदर केला आणि या घटनेबद्दल बोलणं कठीण झालं आहे. हे आमच्या सर्वांसाठी अनपेक्षित आहे.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -