घरमहाराष्ट्रदीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली, अभिनेत्रीवर कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप

दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली, अभिनेत्रीवर कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप

Subscribe

अभिनेत्री दीपाली सय्यद मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात पक्ष बदलाच्या चर्चांमुळे चांगल्याच चर्चेत राहिल्या. मात्र आता त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. दीपाली सय्यद यांच्यावर कोट्यावधींच्या फसवणुकीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. दीपाली सय्यद यांनी ट्रस्टच्या माध्यमातून बोगस लग्न लावत अनेकांची कोट्यावधींची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला आहे. यामुळे दीपाली सय्यद यांच्या ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी अन्यथा आत्मदहन करणार असा इशाराही शिंदे यांनी केला आहे.

भाऊसाहेब शिंदे यांचे आरोप नेमके काय?

दीपाली सय्यद यांनी लग्न झालेल्या जोडप्यांचे पुन्हा लग्न लावून सामुदायिक विवाह सोहळा दाखवला. यातून त्यांच्या ट्रस्टीने कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी हजारो कोटींचे वाटप केले. मात्र ऑडिट रिपोर्ट जेव्हा माझ्या हातात आले तेव्हा या चॅरिटेबल ट्रस्टच्या खात्यात केवळ 9182 रुपये आढळले. त्यामुळे बाकीची रक्कम दीपाली सय्यद यांनी आणली कुठून? याची चौकशी गुन्हे आर्थिक शाखेने करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

- Advertisement -

तसेच दीपाली सय्यद यांचे पाकिस्तान आणि दुबईसोबत कनेक्शन असल्याचा गंभीर आरोपही भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. यासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि दीपाली सय्यद यांच्याच साटेलोटे असल्याची खळबळजनक आरोप शिंदेंनी केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, दीपाली सय्यद यांच्या चॅरिटेबलची आठ दिवसात चौकशी झाली नाही तर मी उपमुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानाबाहेर आत्मदहन करेन. अशा इशाराही भाऊसाहेब शिंदे यांनी दिला आहे.

- Advertisement -

भाऊसाहेब शिंदे यांनी दीपाली सय्यद आणि राज्यपाल कोश्यारींना लक्ष्य करत, त्यांनी कोणत्या तारखेला हा लग्नसोहळा पार पडला हे देखील नमुद केले. यावर भाऊसाहेब शिंदेंनी पुढे म्हटले की, 9 सप्टेंबर 2021 रोजी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली. यात 2016 रोजी लग्न झालेल्या एका दाम्पत्याचं उदाहरण देत ते म्हणाले की, या दाम्पत्याला 2018 मध्ये मुलही झालं, तरी कोश्यारी आणि सय्यद यांनी पुन्हा चॅरिटेबल ट्रस्टअंतर्गत त्यांचे लग्न लावले.

या प्रकरणी दीपाली सय्यद यांची चौकशी व्हावी अशी मागणी आता भाऊसाहेब शिंदे यांनी केली आहे, मात्र दीपाली सय्यद यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.


विनाकारण महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्ला होणं अयोग्य, फडणवीसांचा थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना फोन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -