घरमहाराष्ट्रटेकडीवरुन पडून चितळाचा मृत्यु

टेकडीवरुन पडून चितळाचा मृत्यु

Subscribe

सदर मृत चितळ तीन ते चार वर्षाचे होते व त्याचे मृत्यू डोंगरावरून पडून मृत्यू झाला आहे. सध्या उष्णता वाढल्याने डिहायड्रेशन झाल्याचा अंदाजाला सुनीष कुंजू यांनी नकार दिला.

पवई-भांडुपला जोडणाऱ्या टेकडी परिसरात सकाळीच मृत हरीण आढळल्याने काही अंशी गोंधळ उडाला. मात्र पोलिस आणि वन्यजीव मित्रांनी घटनास्थळी त्वरीत धाव घेतली. हे चितळ प्रकारातील प्राणी असून भित्रा जीव असल्याने टेकडी वरुन पडून याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज मानद वन्यजीव रक्षक सुनीष सुब्रमण्यम कुंजू यांनी प्रथमदर्शनी केला आहे.

बुधवारी सकाळी साडेसात वाजता पॉज-मुंबई या प्राणी संघटनेला सदर घटनेबाबत कळवण्यात आले. हनुमान टेकडी भांडुप येथील स्थानिक रहिवाशी यांनी एका चितळाच्या मृत्यूची माहीती दिली. यावेळी मानद वन्यजीव रक्षक सुनीष सुब्रमण्यम कुंजू, पॉज-मुंबई ए.सी.एफ. चे स्वयंसेवक हसमुख मारुती वळंजू, वन क्षेत्रपाल (प्रादेशिक) मुंबई संतोष कंक हे घटनास्थळी पोहचले. तत्पूर्वी पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी गंगाराम कुसाळे, पी.सी. अशोक सोमनाथ डोंबाळे‌ व महिला पोलीस नाईक सविता बंडु काळे हे घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात होते. सदर मृत चितळाचे पोस्टमार्टमसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथील वन्यजीव वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांच्याकडे नेण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus Impact: सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिलच्या वेतनाबाबत महत्त्वाची बातमी


सदर मृत चितळ तीन ते चार वर्षाचे होते व त्याचे मृत्यू डोंगरावरून पडून मृत्यू झाला आहे. सध्या उष्णता वाढल्याने डिहायड्रेशन झाल्याचा अंदाजाला सुनीष कुंजू यांनी नकार दिला. हरिण प्रकारातील प्राणी हे भित्रे असल्याने मोठा धक्का ते सहन करु शकत नाहीत. त्यामुळे टेकडी वरुन पडल्याचा धक्का या चितळाला सहन झाला नसावा. असे कुंजू म्हणाले.

- Advertisement -

n

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -