घरमहाराष्ट्रलोणावळ्यात बेपत्ता झालेल्या दिल्लीतील 'त्या' तरुणाचा अखेर मृत्यू

लोणावळ्यात बेपत्ता झालेल्या दिल्लीतील ‘त्या’ तरुणाचा अखेर मृत्यू

Subscribe

लोणावळा , खंडाळाच्या जंगलामध्ये जंगल सफारी करत असतानाच हा मुलग रास्ता चुकला आणि हरवला पण लगेच त्याला शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. सर्व तपासयंत्रणा कामाला लागल्या एवढंच नव्हे तर त्या मुलाच्या घरच्यांनी त्याला शोधणाऱ्याला १ लाख रुपयांचं बक्षीस सुद्धा जाहीर केले होते.

‘मला शोधायला कुणीतरी या’ – ही आर्त हाक अखेर शांत झाली आहे. दिल्लीचा एक अभियंता तरुण त्याच्या ऑफिसच्या कामानिमित्त महाराष्ट्रातील कोल्हापुरात आला होता. त्याचं ऑफिसचं काम संपल्यानंतर तो पुण्यात आला आणि लोणावळा, खंडाळाच्या जंगलामध्ये जंगल सफारी करत असतानाच हा मुलगा रस्ता चुकला आणि हरवला, पण लगेच त्याला शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. सर्व तपास यंत्रणा कामाला लागल्या, एवढंच नव्हे तर त्या मुलाच्या घरच्यांनी त्याला शोधणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीससुद्धा जाहीर केले होते. पण आज त्यासंदर्भात एक दुःखद बातमी समोर आली आहे. या दिल्लीच्या मुलाचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि खंडाळ्याच्या घनदाट अरण्यात दिल्लीचा एक तरुण अभियंता जंगल सफारी दरम्यान हरवला, पहिल्यांदा अशी माहिती मिळाली होती. नागफणी सुळका या भागातून खाली उतरताना हा तरुण ज्या पायवाटेने आला, ती पायवाटच तो विसरून गेला. या तरुणाला शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले गेले. त्याचबरोबर त्या तरुणाच्या कुटुंबीयांनीही 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

- Advertisement -

लोणावळ्यामधल्या ड्यूक्स नोज या भागात फिरायला गेलेला दिल्लीस्थित पर्यटक शुक्रवारी दुपारपासून जंगलात बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव फरहान शहा ( farhan shaha) असं होतं. हा तरुण एक अभियंता असून दिल्लीमधला स्थानिक आहे. त्याने आपल्या भावाला फोन करून जंगलात ट्रेनच्या रुळावरून उतरल्याची माहिती दिली. पण त्यानंतर काही तासांनी त्याचा फोन बंद झाला. त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने तो हरवल्याची तक्रार केली. लोणावळा ग्रामीण पोलीस, मावळ वन्यजीव संरक्षक आणि लोणावळा शिवदुर्ग ग्रुपचे स्थानिक स्वयंसेवक या युवकांनी त्या तरुणाचा जंगलात शोध घेतला.

ड्यूक पॉइंटच्या परिसरात या तरुणाचा शोध घेण्यासाठी काही पथकेसुद्धा तैनात करण्यात आली होती. पोलिसांसोबत बचाव पथकातील 50 सामाजिक स्वयंसेवक शोधमोहिमेत सामील झाले झाले होते. फरहान हा 20 मे रोजी हरवला होता आणि त्याचा शोधसुद्धा सुरू होता. वाट चुकल्यामळे फरहान कुटुंबीय आणि मित्रांना याबाबत कळवत होता. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्याचा शेवटचा संपर्क झाला होता. तेव्हा पुढच्या तीन-चार तासात ‘माझा संपर्क न झाल्यास मला शोधायला कोणाला तरी पाठवा’ असं तो म्हणाला होता. त्यानंतर फरहान शहाच्या मोबाईलची बॅटरी लो झाली आणि त्यानंतर त्याचा कुणाशीच संपर्क झाला नाही.

- Advertisement -

दिल्लीवरून कोल्हापूरला कंपनीच्या कामानिमित आलेला तरुण शुक्रवारी पुण्यात जातो मात्र ज्या विमानाने तो जाणार असतो त्यासाठी खूप अवधी होता. म्हणून त्याने लोणावळ्याला फेरफटका मारायचा निर्णय घेतला.पण त्याच्यावर हा प्रसंग ओढवला होता. त्याच्या शोधासाठी लोणावळा पोलिसांसह शिवदुर्ग, मावळ वन्यजीव, रायगड बचाव पथक आणि स्थानिकाकंडून शोधकार्य केले पोलिसांनी फरहानचे मोबाईल लोकेशन वरून मॅप तयार केला. त्यानुसार शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला, पण अखेर या सर्व प्रयत्नांना आत्ता पूर्णविराम लागला आहे. कारण दिल्लीमधल्या या तरुणाचा जंगल सफारी दरम्यान स्वतःला जंगलातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरला आणि त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -