कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांना भाजपचा झटका, मुलाचे नाव उमेदवार यादीतून वगळले

Former Chief Minister Yediyurappa's son was denied ticket to Legislative Assembly by BJP
Former Chief Minister Yediyurappa's son was denied ticket to Legislative Assembly by BJP

कर्नाटकात विधान परिषदेच्या (Legislative Assembly)  सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे कर्नाटकात 3 जूनला होणाऱ्या निवडणूकीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. भाजपकडून मंगळवारी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली. तर काँग्रेसकडूनही यादी जाहीर कण्यात आली. भाजपकडून जाहीर कण्यात आलेल्या यादीत माजी मुख्यमंत्री बीएस येडियरप्पा (Yediyurappa) यांचा समावेश आहे. मात्र, पक्षाने त्यांच्या मुलाच्या नावाची अजून घोषणा केलेली नाही. बीवाय विजयेंद्र हे करनाटक भाजपचे (bjp) प्रदेश उपाध्यक्ष आहेत. मात्र, त्यांना तिकीट नाकरण्यात आल्याचे समजते आहे.

हेही वाचा – Special Report: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेकडून दोन उमेदवारांची नावं आघाडीवर, अनेक नावांची चर्चा

भाजपचे उमेदवार –

कर्नाटक विधान परिषदेच्या (Legislative Assembly)  निवडणुकीसाठी भाजपने 4 उमेदवारांची घोषणा केली आहे. चालुवादी नारायणस्वामी, श्रीमती हेमलता नायक, एस केशवप्रसाद, लक्ष्मण सवदी, बसवराज होरत्ती यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा (Yediyurappa) यांच्या पुत्र विजयेंद्र यांना तिकीट मिळालेले नाही.

काँग्रेस उमेदवार – 

सोमवारी काँग्रेसने एम नागराजू यादव आणि के. अब्दुल जब्बार यांच्या नावाची घोषणा केली आहे. विधान परिषदेच्या सात जागांसाठी विधानसभेचे निवडून आलेले आमदार 3 जून रोजी मतदान करणार आहेत. तर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज मंगळवार शेवटचा दिवस आहे.

हेही वाचा –  मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील असा विश्वास, राज्यसभा उमेदवारीवर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया

यांचा कार्यकाळ संपला –

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नागराजू यादव आणि जब्बार यांच्या उमेदवारीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यादव हे बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC)चे अध्यक्ष आहेत. तर जब्बार सध्या कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी (KPCC) च्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष आणि माजी आमदार राहीले आहेत, असे काँग्रेस कमिटीने आपल्या निवेदनात म्हटले आहे . 7 सदस्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात 14 जून रोजी संपत असल्याने या निवडणुका होत आहेत. भाजपचे लक्ष्मण संगप्पा सवदी, लहारसिंग सिरोया, काँग्रेसचे रामाप्पा तिम्मापूर, अल्लुम वीरभद्रप्पा, वीणा अचय्या एस. आणि जद (सेक्युलर) एचएम रमेश गौडा आणि नारायण स्वामी के.व्ही. यांचा कार्यकाळ संपल्यामुळे विधानपरिषदेच्या 7 जागांवर निवडणूका होत आहेत.