घरCORONA UPDATE'डेल्टा प्लस' व्हेरियंटमुळे महाराष्ट्रात उद्भवणार कोरोनाची तिसरी लाट, तज्ज्ञांचा अलर्ट

‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटमुळे महाराष्ट्रात उद्भवणार कोरोनाची तिसरी लाट, तज्ज्ञांचा अलर्ट

Subscribe

कोरोना विषाणू बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या व्हेरियंटमध्येही सतत बदल करत आहे. यामुळे देशात कोरोना विषाणुचा आणखी एक नवा व्हेरियंट समोर आला आहे. ज्याला डेल्टा प्लस किंवा AY.1 (एवाय.१) या नाव देण्यात आले आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमधून हा नवा व्हेरियंट तयार झाला आहे. या नव्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटमुळे आता राज्यासमोर चिंता अधिक वाढली असून महाराष्ट्रात या व्हेरियंटमुळे कोरोनाची तिसरी लाट उद्भवणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. आत्ताही या व्हेरियंटमुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. तसेच पुढील काही दिवस नागरिकांनी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यास महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येत्या १ ते २ महिन्यात उद्धभवू शकते अशी भीती राज्यातील टास्क फोर्सने व्यक्त केली आहे.

आरोग्य तज्ज्ञांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले अलर्ट

राज्यातील वरिष्ठ डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अलर्ट करत ग्रामीण आणि शहरी भागांतील आरोग्य यंत्रणा, औषध पुरवठा, आणि आरोग्यासंबंधीत उपकरणे सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाच्या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेता पार पडलेल्या एका आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट उद्धवू शकते. राज्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीही असा इशारा दिला की, डेल्टा व्हेरियंटमुळे राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये रूग्णांची संख्या पूर्वीपेक्षा जास्त होती.

- Advertisement -

अशा परिस्थितीत, डेल्टा प्लस व्हेरियंटचा संसर्गा वाढत राहिल्यास राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही रुग्णांची संख्या आणखी जास्त असू शकते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यात सुमारे १९ लाख आणि दुसऱ्या लाटेत
४० लाख रुग्णांची नोंद झाली. यावर आता आरोग्य तज्ज्ञांनकडून इशारा दिला जातोय की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जवळपास ८ लाख सक्रिय रुग्ण असू शकतात. तर यात १० टक्के लहान मुलांचा समावेश असेल.

भारतात पहिल्यांदाच या व्हेरियंटवरची माहिती आली समोर

‘डेल्टा +’ हा व्हेरियंट कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा’ किंवा ‘बी 1.617.2’ व्हेरियंटमध्ये झालेल्या परिवर्तनामुळे तयार झाला आहे. ‘डेल्टा’ व्हेरियंट भारतात प्रथम ओळखला गेला. भारतातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी ‘डेल्टा प्लस’ हा व्हेरियंट जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु हा नवा व्हेरियंट रुग्णासाठी कितपत धोकादायक आहे हे अद्याप समोर आलेले नाही. डेल्टा प्लस या व्हेरियंटवर ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल’ उपचार पद्धती प्रभावी असल्याचे समोर येत आहे. या उपचार पद्धतीला नुकतीच भारतात मंजूर मिळाली आहे.

- Advertisement -

McDonald च्या नाईट शिफ्टला कंटाळला, I Hate this Job म्हणत ड्राइव थ्रूवरच सोडला राजीनामा

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -