घरCORONA UPDATELockdown : सरकार आणि महापालिकेच्या मदतीपासून तृतीयपंथी समाज वंचित!

Lockdown : सरकार आणि महापालिकेच्या मदतीपासून तृतीयपंथी समाज वंचित!

Subscribe

कामगारांबरोबरच भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या तृतीयपंथी समाजाचीही उपेक्षा होत आहे.

देशासह मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या रोजंदारीवर काम करणाऱ्या घटकातील कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, या कामगारांबरोबरच भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या तृतीयपंथी समाजाचीही उपेक्षा होत आहे. लॉकडाऊनमुळे दिवसाची कमाई थांबली. त्यामुळे खायचे काय असा प्रश्न तृतीयपंथीयांना पडला आहे. मात्र, समाजातील गरीब, गरजू, तसेच निराधार लोकांपर्यंत सरकार आणि महापालिकेचे लक्ष असले तरी या उपेक्षित समाजातील लोकांवर दोन्ही यंत्रणांचे लक्ष दिसत नाही. ना या लोकांकडे रेशनकार्ड आहे, ना अन्य काही कागदपत्रे. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजनेपासून दूर लोटलेल्या या समाजाला किमान या आणीबाणीच्या काळात तरी सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून त्यांचे जीवन सुकर करावे, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुंबईत आजमितिस केवळ दोन हजारहून अधिक नोंदणीकृत तृतीयपंथी आहेत. परंतु नोंदणीकृत नसलेलेही काही तृतीयपंथी आहेत. ज्यांची संख्या दोन लाखांवर आहे. यातील बरेचसे तृतीयपंथी आपली ओळख लपवून आपल्या घरीच राहत आहेत. परंतु बरेच तृतीयपंथी आपले घर सोडून आपल्या समाजासह राहत आहेत. भीक मागणे, लग्नात किंवा अन्य सोहळ्यात नाचगाणे करणे किंवा शरीर विक्रय करणे, हेच या समाजातील घटकाचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. परंतु देशासह मुंबईत लॉकडाऊन झाल्यामुळे या समाजातील लोकांचे प्रचंड हाल होवू लागले आहे. असली नसलेली जमवलेली पंजी वापरली गेली आहे. त्यामुळे कमाईचाच मार्ग बंद झाल्यामुळे आता एक वेळच्या जेवणाचीही मारामारी होवू लागली आहे.

- Advertisement -

सध्या अशा तृतीयपंथीयांची जबाबदारी किन्नर माँ एक सामाजिक संस्थेने उचलली आहे. या संस्थेच्या प्रकल्प अधिकारी प्रिया पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आमच्या संस्थेच्या माध्यमातून दर महिन्याच्या ४ तारखेला रेशन पुरवले जाते. जे तृतीयपंथी आर्थिकदृष्टया सक्षम नाहीत, त्यांची काळजी घेतली जाते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व तृतीयपंथीयांची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे विविध संस्था, आमदार, खासदार तसेच नगरसेवक यांच्याकडून मदत मिळवत आमच्या समाजातील लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी सुरक्षेच्या कारणास्तव सर्वच मोहल्ल्यात जाणे शक्य होत नाही. संस्थेच्या माध्यमातून जरी आम्ही करत असलो तरी सरकारचे आणि पर्यायाने महापालिकेचेही कर्तव्य आहे. जीवनावश्यक वस्तूंची किमान अपेक्षा आमच्या समाजातील असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार गरीब व गरजू कुटुंबांना रेशनवर कमी दरात धान्य उपलब्ध करून देते. परंतु आमच्या समाजातील लोकांकडे रेशनकार्डच नाही, तर ते त्याचा लाभ कसे घेणार असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे सरकारने या माध्यमातून रेशनकार्डचीही सुविधा उपलब्ध करून त्यांना स्वस्तातील रेशन मिळवता येईल. परंतु अद्यापही सरकारकडून तृतीयपंथी समाजाला मदत मिळत नाही. तसेच महापालिकेच्या माध्यमातूनही अशी मदत दिली जात नाही. त्यामुळे मला माझ्या समाजातील लोकांची फार चिंता वाटते. आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून कामाठीपुरा, धारावी, माहिम आदी ठिकाणी मदत पुरवता आली असली तरी अशा अनेक ठिकाणी तृतीयपंथी मोठ्या संख्येने राहत आहेत. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि महापौरांनी तृतीयपंथी समाजापर्यंत जीवनावश्यक वस्तू पुरवून त्यांचे जीवन सुकर करावे, असे आवाहनच प्रिया पाटील यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -