घरताज्या घडामोडीतक्रार मागे घेतली, पण धनंजय मुंडेंच्या बदनामीचं काय? - अजित पवार

तक्रार मागे घेतली, पण धनंजय मुंडेंच्या बदनामीचं काय? – अजित पवार

Subscribe

रेणू शर्मा या महिलेने बलात्कारची तक्रार मागे घेतल्यामुळे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘शक्ती कायद्याबद्दल बारकाईने विचार करण्याची गरज आहे. धनंजय मुंडेंबाबतचं स्पष्ट चित्र समोर येताच एखाद्याची बदनामी करणं चुकीचं आहे. यामुळे मुंडे कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागला आहे. आता याला वाली कोण?’

अजित पवारांनी केला सवाल

‘एखादा व्यक्ती राजकारणामध्ये काम करायला लागला किंवा सामाजिक क्षेत्रातमध्ये काम करायला लागला तर त्याला काम करत असताना त्याचे नाव लोकांमध्ये चांगले होण्याकरिता प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. बरेच दिवस घालावे लागतात. पण असा कोणी आरोप केला तर एका क्षणात त्या व्यक्तीची बदनामी होते, लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. विरोधक हा मुद्दा लगेच हाताशी धरतात. ते त्याच्यावर बोट ठेवतात, महिला संघटना आंदोलन करण्यास सुरुवात करतात. राजीनामा दिला पाहिजे, अशा अनेक मागण्या होतात. अनेकांनी धनंजय मुंडें यांच्यासंदर्भात वक्तव्य कोणतीही माहिती न करता केली. याला जबाबदार कोण? त्याला कोण उत्तर देणार?’, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

- Advertisement -

पक्षाची झाली बदनामी

पुढे अजित पवार म्हणाले की, ‘एक तरुण नेते म्हणून राष्ट्रवादीने त्यांना संधी दिली, त्यांनी त्याचं सोनं केलं. विधानसभेच्या निवडणुकीत ते मोठ्या मतांनी निवडून आले. पंकजामुंडे यांच्यासारख्या कॅबिनेट मंत्र्यांचा त्यांनी पराभव केला आणि असं असताना महाविकास आघाडीने त्यांना महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी दिली. ते त्याचे काम करत होते. एक बहुजन समाजातून पुढे आलेला सहकारी सात-आठ दिवस अशा आरोपांमुळे अस्वस्थ होते. आता याला वाली कोण? त्यांनी पहिल्या आरोप केला आणि काल तक्रार मागे घेतली. पण सात-आठ दिवस जो भयंकर त्रास भोगावा लागला, त्याच्यात पक्षाची देखील बदनामी झाली. संपूर्ण चित्र पुढे न येता, एखाद्याची बदनामी करणं, त्याला जनमानसातून उठवणं योग्य नाही. याचा विचार करायला पाहिजे.’


हेही वाचा – धनंजय मुंडेंना मोठा दिलासा; रेणू शर्माने बलात्काराची तक्रार घेतली मागे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -