घरमहाराष्ट्रदिवंगत पोलीस अधिकार्‍यांना मागितला संपत्तीचा तपशील

दिवंगत पोलीस अधिकार्‍यांना मागितला संपत्तीचा तपशील

Subscribe

कामटे, रॉय, सहाय, मंड्या यांच्या नावे गृहखात्याची नोटीस

राज्याच्या गृहविभागाने १४ आयपीएस अधिकार्‍यांना त्यांची स्वतःची संपत्ती जाहीर करण्यासाठी त्यांच्या नावाची नोटीस पाठवली आहे. त्यामध्ये शहीद अशोक कामटेंशिवाय या यादीमध्ये मृत्यू पावलेल्या अधिकार्‍यांमध्ये माजी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हिमांशू रॉय, माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. के. सहाय तसेच माजी उपायुक्त आनंद मंड्या या दिवंगत अधिकार्‍यांचा समावेश आहे. गृहखात्याच्या या कृतीविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या यादीतील काहीजण सेवानिवृत्त झाले आहेत तसेच काही जणांना सेवेतून काढून टाकले आहे. गृहमंत्रालयाने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ही १४ आयपीएस अधिकार्‍यांची यादी सरकारला पाठवली. त्यात या अधिकार्‍यांनी आपल्या मालमत्तेचे वार्षिक विवरण दाखल केलेले नाही, असे म्हटले. नियमानुसार, देशातील सर्व आयएएस, आयपीएस आणि आयआरएस अधिकार्‍यांना आपल्या मालमत्तेचे वार्षिक विवरण केंद्र सरकारकडे पाठवणे अनिवार्य असते.

- Advertisement -

ज्या चार दिवंगत अधिकार्‍यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यातील अशोक कामटे हे मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांशी मुकाबला करताना शहीद झाले. तर हिमांशू रॉय यांनी मे २०१८ मध्ये कॅन्सरशी बराच काळ लढा देताना या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली. सहाय यांनी सन २०१३ मध्ये त्यांच्या निवासस्थानी स्वतःला पेटवून घेतले होते, त्यानंतर उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. तर मंड्या यांचा मे २०१८ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर पंधरा दिवसांतच मृत्यू झाला.

या यादीत माजी मानवाधिकार आयुक्त सदस्य आणि निवृत्त आयपीएस अधिकारी भगवंतराव मोरे, आयपीएस अधिकारी विजय कृष्ण यादव ज्यांना सन २०१८ मध्ये लाचप्रकरणात बडतर्फ करण्यात आले होते. महिला आयपीएस अधिकारी मॅरी लो फर्नांडिस ज्या बारा वर्षांपेक्षा अधिक काळ कामावर गैरहजर राहिल्याने त्यांनी राजीनामा दिला असे मान्य करुन २०१७ मध्ये त्यांना सेवामुक्त करण्यात आले होते. तर व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. ज्यांनी २०१८ मध्ये राजकारणात प्रवेश करायचा असल्याने आपल्या सेवेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सध्या जे सेवेत आहेत त्यांपैकी पी.एन. रासकर, दलबीर सिंग भारती, अजयकुमार बन्सल, पी.एन. मगर, अंकित गोयल आणि हिरानी ए मोहन कुमार या अधिकार्‍यांची नावे या यादीत आहेत.

- Advertisement -

गृहखात्याकडून या नोटीस पाठवताना अशी अक्षम्य चूक कशी झाली, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. अशा प्रकारे दिवंगत पोलीस अधिकार्‍यांच्या नावाने नोटीस पाठवून गृहखात्याचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -