घरताज्या घडामोडीDevendra Fadnavis : फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Devendra Fadnavis : फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीसांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. मार्च २०२१ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मी एक पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारचा होम डिपार्टमेंटमधील बदल्यांचा महाघोटाळा बाहेर काढला होता. त्याचे पेनड्राईव्ह आणि पुरावे सर्व माझ्याकडे आहेत. हे सर्व पुरावे देशातील होम सेक्रेटरीला सुपूर्द करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

बदली घोटाळ्याबाबत फडणवीसांचा स्फोट

मुंबईतील बॉम्बस्फोटाच्या आरोपींशी व्यवहार करणारे जेलमध्ये जाऊनही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कायम आहेत, याबद्दल मी खंत व्यक्त करतो. मार्च २०२१ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मी एक पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारचा होम डिपार्टमेंटमधील बदल्यांचा महाघोटाळा बाहेर काढला होता. त्याचे पेनड्राईव्ह आणि पुरावे सर्व माझ्याकडे आहे. हे सर्व पुरावे देशातील होम सेक्रेटरीला सुपूर्द करणार आहे, हे देखील त्यावेळी मी नमूद केलं होतं. त्यानुसार जी काही महाघोटाळ्याची माहिती माझ्यासमोर होती. ही सर्व माहिती घेऊन मी दिल्लीला गेलो आणि भारताचे होम सेक्रेटरी यांच्यासमोर ही माहिती सादर केली, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

बदल्या घोटाळ्याची चौकशी सीबीआय करतेय

या पुराव्यांचं गांभीर्य ओळखून न्यायालयाने या संदर्भातील सर्व चौकशी ही सीबीआयकडे सुपूर्द केली आहे. आता या बदल्या घोटाळ्याची चौकशी सीबीआय करत आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यांच्याही चौकशी यामध्ये सहभाग आहे. ज्यावेळी ही सर्व चौकशी सीबीआयकडे ट्रान्सफर झाली. त्यावेळी राज्य सरकारने आपला घोटाळा दाबण्याकरीता एक एफआयआर दाखल केला. ऑफिशीअल सीक्रेट अॅक्टमधील माहिती लीक कशी झाली, अशा प्रकारचा एफआयआर आहे. या एफआयआरच्या संदर्भात मला पोलिसांकडून प्रश्नावली विचारण्यात आली. परंतु याची माहिती मी देईन, असं फडणवीस म्हणाले.

मुंबई पोलिसांकडून सीआरपीसी-१६० ची नोटीस 

माझी माहिती कुठून आली. याबाबतचा प्रश्न मला विचारला जाऊ शकत नाही. त्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीये,
असं वारंवार कोर्टात सांगण्यात आलं. काल मुंबई पोलिसांनी मला सीआरपीसी-१६० ची नोटीस पाठवली आहे. याच बदल्यांच्या घोटाळा प्रकरणामध्ये त्यांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या संदर्भात मला उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं आहे. जरीही मला प्रीव्हलेज असलं तरी माझ्या माहितीचा स्रोत हा विचारला जाऊ शकत नाही. या संदर्भातील जी माहिती बाहेर आली. ती राज्य सरकारच्या मंत्र्यांनी प्रेसला दिली होती. त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. तसेच मी स्वत: त्याठिकाणी जाणार असून पोलीस जी काही माझी चौकशी करतील. त्याला योग्य ते उत्तर मी देणार आहे, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

अहवाल सहा महिने धूळखात असून सरकारने यावर कारवाई केली नाही. त्यामुळे कारवाई न करणाऱ्या सरकारवर कारवाई केली पाहीजे. पर्वाच्या षडयंत्राचा भांडाफोड मी स्वत: केलाय. त्यामुळे राज्य सरकार आणि पोलीस अधिकाऱ्यांना याचं उत्तर सूचत नसल्यामुळे अशा प्रकारची नोटीस मला पाठवण्यात आली आहे. मी उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणार असल्याचं फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : IPL 2022 : Aaron Finch चा आयपीएलमध्ये अप्रतिम विक्रम, ९ संघातून खेळणारा पहिला खेळाडू


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -