घरमहाराष्ट्रआघाडी सरकार दाऊद इब्राहिमला समर्पित

आघाडी सरकार दाऊद इब्राहिमला समर्पित

Subscribe

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका, चहापानावर विरोधी पक्षाचा बहिष्कार

देशद्रोह्यांशी संबंध असणे हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा बचाव करताना जनाची नाही तर किमान मनाची ठेवा, असा सणसणीत टोला लगावताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मलिक यांचा राजीनामा न घेणारे आघाडीचे सरकार दाऊद इब्राहिमला समर्पित असल्याची टीका केली.

दाऊद सारख्या देशद्रोह्याच्या सोबत व्यवहार करणारे मंत्री नवाब मलिक यांना हे सरकार पाठिशी घालते. या माध्यमातून एका विशिष्ट समाजाला संदेश देऊन मतांचे ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. संजय राठोड आणि अनिल देशमुखांचा राजीनामा लगेच मंजूर होतो. मात्र, मलिकांचा होत नाही. जोपर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

- Advertisement -

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज, गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्यावतीने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्ष ठाम असल्याचे सांगितले. तसेच विविध मुद्यांवर सरकारला धारेवर धरण्याचा इरादाही त्यांनी बोलून दाखवला.

अजित पवारांच्या शब्दाला किंमत नाही
या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला कोणतीही किंमत उरलेली नाही. त्यांनी शेतकर्‍यांची वीज जोडणी तोडली जाणार नाही, असा शब्द दिला होता. मात्र, आता तर वीज जोडणी कापण्यासाठी कंत्राटदारांची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे अशा सरकारच्या चहापानाला उपस्थित राहण्याची आमची कोणतीही इच्छा नाही, असे फडणवीस म्हणाले. शेतकर्‍यांची वीज तोडल्याने पिके वाळून, जळून जात आहेत. शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष नाही. राज्यात विजेचे संकट सुरू असून त्याचाही जाब आम्ही सरकारला विचारू, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मराठा आरक्षणावरून छत्रपती घराण्यातील व्यक्तीला उपोषणाला बसावे लागले. याआधी देण्यात आलेलीच आश्वासने यावेळीही देण्यात आली. मात्र, ती आश्वासने पूर्ण होतील याची कोणतीही खात्री नाही. आमचे सरकार असताना मराठा समाजासाठी ज्या योजना सुरू करण्यात आल्या त्या बंद करण्याचे काम या सरकारने केले. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आम्ही महाज्योती योजना सुरू केली होती. पण त्याचेही पैसे या सरकारने दिलेले नाहीत. शिवाय सरकारमधील ओबीसी नेते महाज्योतीसाठी एक पैसाही मागत नाहीत. ही योजना सरकार बंद करण्याच्या मार्गावर आहे. पेसा आणि सामाजिक न्याय विभागात प्रचंड गैरकारभार सुरू आहे. कारकूनच त्याच्या साहेबाकडे लाच मागतो आहे. वाळू, दारू, खंडणी आणि भ्रष्टाचाराची परमसीमा या सरकारने गाठली आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. मागच्या तीन वर्षांत शेतकर्‍यांवर अस्मानी संकट आल्याने तो अडचणीत असताना शेतकर्‍यांची वीज तोडली जात आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

दाऊदची धुणीभांडी थांबवा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशापासून ते महापालिकेपर्यंत भाजपने सत्ता भोगायची, मग आम्ही काय धुणीभांडी करायची का? असा सवाल केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले,त्यांनी काय करायचे हे त्यांनी ठरवावे. पण त्यांच्याकडचे काही जण दाऊदकडे धुणी भांडी करतात ते बंद झाले पाहिजे. त्यांनी मी घेतो त्या पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन उत्तरे द्यावीत. उगाच फिक्स मॅच कशाला खेळायची, असा टोलाही फडणवीस यांनी ठाकरे यांना लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -