घरमहाराष्ट्रठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडे वसूलीचे सॉफ्टवेअर, देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडे वसूलीचे सॉफ्टवेअर, देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप

Subscribe

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर होणाऱ्या आयटीच्या रेडमधून लक्षात येतय की, वसूलीचे सॉफ्टवेअर तयार केलं आहे आणि त्यातून अलर्ट घेतले जात आहेत की कोणाकडून किती वसूली करायची आहे. असा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. आज ते नागपूरात माध्यमांशी बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यादरम्यान ईडीच्या कारवायांवरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला होता. या आरोपांना आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्याचे प्रमुख म्हणून आयटी विभागाच्या रेडमधून सांगितलं आहे ते ऐकून तुम्हाला झोप यायला नको होती की राज्यात इतकी प्रचंड प्रमाणात दलाली चाललली आहे. दलाली आता या स्तरावर पोहचली आहे की, काही मंत्र्यावरील आयटीच्या रेडमधून लक्षात येतय की, वसूलीचे सॉफ्टवेअर तयार केलं आहे आणि त्यातून अलर्ट घेतले जात आहेत की कोणाकडून किती वसूली करायची आहे. हे याठिकाणी जर चालतं असेल तर या महाराष्ट्रामध्ये ईडी सीबीआय येणारचं आहे. ईडी, सीबीआयचं भय कोणाला असेल ज्यांनी काही केलं असेलं त्यांना भय असेल. अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

- Advertisement -

“ईडी, सीबीआयबाबत मुख्यमंत्री बोलले. ती का येते? ती आम्ही नाही आणली. कारण उद्धव ठाकरे ज्या सरकारचं नेतृत्व करतात ते राज्याच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. शेतकऱ्यांना मदत करताना यांच्याकडे पैसे नसतात. काहीतरी कारणं सांगत पाठ दाखवली जाते. बांधावर जात संपूर्ण कर्जमाफी देऊ अशी आश्वासन दिली जातात. यांनी जो भ्रष्टाचार चालवला आहे त्यामुळे ईडी, सीबीआय यांच्या धाडी पडत आहेत. खंडणी उकळणं हाच या सरकारचा अजेंडा आहे,” अशीही टीका फडणवीस यांनी केली.

काल गरळ ओकताना मी मुख्यमंत्र्यांना बघितलं, सत्तेत असल्यामुळे कदाचित त्यांना विस्मर झालं की, जनतेने भारतीय जनता पक्षाला नाकारलं नाही. जनतेने काँग्रेस, राष्ट्रवादीला नाकारलं आणि शिवसेनेला वरपास केले. जेवढ्या जागा लढलो त्यातील जवळपास ७० टक्के जागा भापजा जिंकली शिवसेना ४५ टक्के जागा जिंकली. त्यामुळे शिवसेना जनतेच्या मताशी बैईमानी करुन सत्तेवरवर आले. शिवसेना ज्या अवीर्भावात सांगतेय, जनतेने भाजपाला नाकारलं, नव्हे जनेतेने काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं आणि शिवेसनावर पास केले. असही फडणवीस म्हणाले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याचे ठाकरे सरकारचे मनसुबे, फडणवीसांची टीका


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -