घरमहाराष्ट्रDevendra Fadnavis : "याचे क्रेडिट अजित दादांनाच", फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Devendra Fadnavis : “याचे क्रेडिट अजित दादांनाच”, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Subscribe

निवडणूक आयोगाने शरद पवार यांना तुतारी हे पक्ष चिन्ह दिले आहे. ज्याचे आज किल्ले रायगडावर अनावरण करण्यात आले. याच मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

पुणे : शरद पवार यांना अजित पवार यांच्यामुळे 40 वर्षांनंतर किल्ले रायगडावर जावे लागले आहे, ज्यामुळे याचे क्रेडिट अजित दादांना द्यावे लागेल, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार शरद पवार यांना टोला लगावला आहे. पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी विविध पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. तर राज ठाकरेंनी पुन्हा ईव्हीएमला विरोध केल्याने त्यावरही टीका केली आहे. (Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over Trumpet Symbol)

हेही वाचा… Raj Thackeray : “तुतारी मिळाली तर आता ती फुंका”, ठाकरेंचा पवारांना टोला

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. केवळ मुद्देमाल जिथे मिळतो तिथपर्यंत सीमित न राहता त्याचा खोलवर तपास करा, असे पोलिसांना निर्देश देण्यात आले होते. तेच काम पुणे पोलिसांनी केले आणि मोठा साठा जप्त करण्यात यश मिळाले आहे. हे जे षडयंत्र सुरू होते, त्या षडयंत्राचे अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पुणे पोलिसांमुळे अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कारण अनेक राज्यांमध्ये या प्रकरणाची कारवाई करावी लागेल. त्यामुळे पुणे पोलिसांच्या माहितीनुसार वेगवेगळ्या राज्यात ही कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांकडून देण्यात आली आहे.

याचे श्रेय अजित दादांना…

किल्ले रायगडावर आज तुतारी वाजली, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले की, मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की, 40 वर्षांनंतर शरद पवार हे रायगडावर गेले. अजित पवारांना या गोष्टीचे क्रेडिट तर द्यावेच लागेल की, त्यांच्यामुळे 40 वर्षांनंतर शरद पवार यांना अजित दादांमुळे रायगडावर जावे लागले. त्यामुळे आता तुतारी कशी वाजते? कधी वाजते? कुठे वाजते? किती वाजते? हे भविष्यात कळेल, असा टोलाच त्यांनी शरद पवार यांना लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -