घरमहाराष्ट्रमराठी माणसाचा उत्साह आता कमी होता कामा नये; देवेंद्र फडणवीसांचा आशावाद

मराठी माणसाचा उत्साह आता कमी होता कामा नये; देवेंद्र फडणवीसांचा आशावाद

Subscribe

मुंबई भाजपा दिवाळी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोरोनाच्या दोन वर्षानंतर दिवाळीच्या निमित्ताने आपण मोठा श्वास घेत आहोत. मराठी माणसाचा हा उत्साह आता कमी होता कामा नये तो उत्तरोत्तर वाढत राहो असा आशावाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी फडणवीस म्हणाले की, दिवाळी हा सण मराठी माणसाच्या हृदयाच्या जवळचा आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी आनंददायी ठरावी यासाठी आम्ही आनंद शिधा हा उप्रकमही राबवित आहोत. त्यात अवघ्या शंभर रुपयांत देण्यात येणाऱ्या संचात एक किलो साखर, एक किलो चणा डाळ, एक किलो रवा आणि एक लिटर पामतेल या चार पदार्थांचा समावेश आहे. आ. मिहिर कोटेचा, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी अतिशय उत्तम आयोजन केले असून वरळीकरांचा प्रतिसादही वाढतो आहे . यंदाची दिवाळी सर्वांना सुख – समाधान आणि आरोग्यदायी जावो असेही ते म्हणाले.

- Advertisement -

मुंबई भाजपातर्फे वरळीतील जांबोरी मैदानावर सुरू असलेल्या दिवाळी महोत्सवाला देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भेट दिली. याप्रसंगी पर्यटन, महिला व बालकल्याण मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, आ. कालिदास कोळंबकर, आ. मिहिर कोटेचा, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे उपस्थित होते. पुष्कर श्रोत्री यांनी सूत्रसंचालन केले.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला शनिवारचा मुहूर्त साधत वरळीकरांनी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली. २३ ऑक्टोबर, रविवारपर्यंत दीपोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी, सहभागी स्टॉलधारकांचा उत्साह वाढविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी भेट देऊन माहिती घेतली. धर्म, संस्कृती, संस्कार व परंपरा पुढे नेण्याकरिता अशा महोत्सवाची गरज असल्याचेही लोढा यांनी आवर्जून नमूद केले.

- Advertisement -

वादकानी कलाकारांना उत्तम साथ देत आपल्या वाद्यांच्या आधारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविली. सहभागी गायक – गायिकानी हिंदी आणि मराठी चित्रपटातील अजरामर गाण्यांचे सादरीकरण केले, यावेळी उपस्थित रसिकही वाद्यरंगात रंगून गेले. गायक राहुल सक्सेना याने ‘ उसवलं गणगोत सार ‘ , गायिका अभिलाषा चेलमने ‘ ही गुलाबी हवा ‘ , ‘ रुपेरी वाळूत माडाच्या वनात ‘ तर गायक स्वप्नील बांदोडकरने ‘ राधाही बावरी ‘ , ‘ मला वेड लागले प्रेमाचे ‘ गाणी सादर करून उपस्थित कला रसिकांचे मन जिंकले. कार्यक्रमात लकी ड्रॉ विजेत्यांना पैठणी आणि प्रथम क्रमांकाची दुचाकी प्राप्ती बिर्जे यांना मिळाली.मजुरांना गावी घेऊन जाणारी बस उलटली, १४ जणांचा जागीच मृत्यू

संस्कृती आणि परंपरेचा वारसा पुढे नेणारा महोत्सव – ॲड. मंगलप्रभात लोढा

महाराष्ट्राच्या कला संस्कृती आणि परंपरेचा वारसा पुढे नेणारा हा दीपोत्सव असून आपली खाद्य संस्कृती, आपली वेशभूषा, संगीताच्या मैफिलीचा सहकुटंब आनंद घ्यावा असे आवाहन पर्यटन, महिला व बालकल्याण मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केले.


मजुरांना गावी घेऊन जाणारी बस उलटली, १४ जणांचा जागीच मृत्यू

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -