घरताज्या घडामोडीवसुलीला सरकारचा ससा होतो, अन् शेतकऱ्यांना मदतीसाठी कासव, फडणवीसांची टीका

वसुलीला सरकारचा ससा होतो, अन् शेतकऱ्यांना मदतीसाठी कासव, फडणवीसांची टीका

Subscribe

शेतकर्‍यांप्रति ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘महाविकास’ नेते आता बंद पुकारतील काय?

राज्य सरकारने मार्च, एप्रिल, मे २०२१ मध्ये झालेल्या नुकसानीचा मदतीचा जीआर ६ ऑक्टोबर २०२१ ला काढला यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी एकरी ५० हजार रुपयांची मागणी करणारे सरकार आता आपला हात का आखडता घेत आहे? असा सवार फडणवीस यांनी केला आहे. तर वसुलीसाठी धावणारं सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला का धडपडतंय असा खोचक सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे. राज्यात विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारने मार्च, मे महिन्यातील नुकसाग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत आता जीआर काढला आहे. उशीरा मदत जाहीर केली परंतु मदतीचे आकडे त्याहून संतापजनक असल्याचे फडणवीसांनी म्हटलं आहे. मार्च ते मे महिन्यात झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने संपूर्ण रत्नागिरी जिल्हा ५.१० लाख, सिंधुदुर्ग जिल्हा २४ लाख, परभणी जिल्हा २५ लाख, हिंगोली १४ लाख, नांदेड २० लाख, उस्मानाबाद १.७४ लाख, यवतमाळ १० लाख, नागपूर २३ लाख, वर्धा ३९ लाख, गोंदिया २६ लाख, चंद्रपूर ३५ लाख रुपये फक्त घोषित केले आहेत.

- Advertisement -

राज्य सरकारने जुलै २०२१ च्या मदतीची भरघोस घोषणा केली आहे. यामध्ये नागपूर विभागातील ६ जिल्हे मिळून फक्त १० कोटी रूपये आणि संपूर्ण नाशिक विभागातील सर्व ५ जिल्हे मिळून फक्त १ लाख रूपयांची मदत करण्यात आली आहे. म्हणजे एक जिल्हा फक्त २० हजार रुपये मदत करण्यात आल्यामुळे फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकर्‍यांप्रति ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘महाविकास’ नेते आता बंद पुकारतील काय? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या मदतीवेळी सरकारचा कासव होतो

वसुलीसाठी धावणारे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीचा विषय आला की या ठाकरे सरकारचा कासव होतो. विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकऱ्यांना मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु सहा-आठ महिने मदतीचे आदेश जर निघत नसतील, तर प्रत्यक्ष मदत केव्हा पोहोचणार? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे. तर एकरी ५० हजारांची मागणी करणारे आता हात का आखडता घेताहेत? असाही सवाल फडणवीसांनी केला आहे.


हेही वाचा : महाराष्ट्रात IT च्या दुसऱ्या दिवशीही धाडी सुरु, १ हजार ५० कोटींचे आढळले संशयास्पद व्यवहार


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -