घरमहाराष्ट्रकार्तिकी वारीत विठ्ठलचरणी २ कोटींचे दान

कार्तिकी वारीत विठ्ठलचरणी २ कोटींचे दान

Subscribe

यंदाच्या कार्तिकी वारीला गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. यंदा कार्तिकी वारीत विठ्ठलचरणी २ कोटींचे दान आले आहे.

कार्तिकी वारीच्या काळात मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेतात. यंदाही तब्बल आठ लाख भाविकांनी श्री विठ्ठल – रखुमाईचे दर्शन घेतले. यादरम्यान अनेक भाविकांनी देवाच्या चरणी दान केले. यंदा कार्तिकी वारीत विठ्ठलचरणी एक कोटी ९८ लाखांचे दान आले असल्याची माहिती मंदिराच्या समितीने दिली आहे.

यंदा अधिकचे उत्पन्न

गेल्या कार्तिकी वारीमध्ये समितीला एक कोटी ३० लाख ४५ हजार ३५२ रुपये इतके उत्पन्न मिळाले होते. यावर्षी मंदिर समितीला ६७ लाख ७६ हजार ८२ रुपये अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. कार्तिकी वारी काळात ३ लाखांहून अधिक भाविकांनी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन तर पाच लाख सहा हजार ३३५ भाविकांनी पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेतला आहे.

- Advertisement -

असे आहे देणगीचे स्वरुप

श्री विठ्ठलाच्या पायावर ओवाळणीच्या स्वरुपाय २३ लाख ७७ हजार ९८१ रुपये आले आहेत. तर श्री रुक्मिणीमातेच्या पायावर सास लाख ९२ हजार २६० रुपये आले असून अन्नछत्र देणगी ६१ हजार ६५० तर पावती स्वरुपातील देणगी ८८ लाख ६९ हजार १८६ रुपये, बुंदी लाडूप्रसाद विक्रीद्वारे ३३ लाख २३ हजार ८५० रुपये आले आहेत. राजगिरा लाडूविक्री ३ लाख ३३ हजार ५०० तर फोटो विक्रीद्वारे ६६ हजार ६५०, मंदिर समितीच्या विविध भक्तनिवास देणगीद्वारे चार लाख ९१ हजार ९०, नित्यपूजा चार लाख, हुंडी पेटीत जमा २४ लाख ८८ हजार ५३७ ऑनलाइन देणगी दोन लाख ७१ हजार ७३० तर अन्य स्वरुपातील तीन लाख ४५ हजार रुपये जमा झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -